ms dhoni ravindra jadeja 
फोटोग्राफी

जडेजाच नव्हे, या १० खेळाडूंनाही IPL मध्येअर्ध्यातच सोडावे लागले कर्णधारपद

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून हे सुरू असून जडेजाच्या आधी 10 कर्णधारांना हंगामाच्या मध्यावर काढून टाकण्यात आले आहे.

Kiran Mahanavar

आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनी आता चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असेल. हंगामाच्या सुरुवातीला धोनीने पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या जागी रवींद्र जडेजाची निवड करण्यात आली होती. मात्र संघाच्या सततच्या खराब कामगिरीनंतर धोनीने पुन्हा एकदा कमान आपल्या हातात घेतली आहे. मात्र आयपीएलच्या मध्यावर एखाद्या संघाने कर्णधार बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून हे सुरू असून जडेजाच्या आधी 10 कर्णधारांना हंगामाच्या मध्यावर काढून टाकण्यात आले आहे.(Changed Captains IPL Mid Season)

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी 2022 हंगाम सुरू होण्यापूर्वी त्याचे पद सोडले. त्याच्या जागी रवींद्र जडेजाला ही जबाबदारी मिळाली. मात्र संघाच्या खराब कामगिरीनंतर धोनी पुन्हा एकदा जडेजाच्या जागी कर्णधार बनला आहे.
गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला केवळ 6 सामन्यांनंतर वगळले कारण संघाने त्यापैकी पाच सामने हरले होते. त्याच्या जागी न्यूझीलंडचा केन विल्यमसन कर्णधार झाला.
2020 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने 7 सामन्यांनंतर दिनेश कार्तिकला कर्णधारपदावरून हटवले. त्याच्या जागी इंग्लंडच्या इऑन मॉर्गनला ही जबाबदारी देण्यात आली.
2019 मध्ये राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेच्या जागी स्टीव्ह स्मिथला कर्णधार म्हणून नियुक्त केले. तरीही संघाला फार काही करता आले नाही.
2018 मध्ये गौतम गंभीर दिल्लीला परत आला. त्यानंतर गंभीर बॅटने चमत्कार करू शकला नाही. त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि श्रेयस अय्यरकडे जबाबदारी दिली.
2016 मध्ये पंजाब किंग्जने डेव्हिड मिलरच्या जागी मुरली विजयला कर्णधार म्हणून नियुक्त केले. मिलरने 6 सामन्यात फक्त 76 धावा केल्या होत्या.
शेन वॉटसनच्या दुखापतीनंतर स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थानने सलग 4 सामने जिंकले. त्याच्या पुनरागमनानंतर वॉटसनला कर्णधारपदात आश्चर्यकारक कामगिरी करता आली नाही आणि स्मिथला नियमितपणे जबाबदारी मिळाली.
2014 मध्ये हैदराबादच्या खराब कामगिरीनंतर शिखर धवनला सीझनच्या मध्यभागी वगळण्यात आले होते. त्याच्या जागी विश्वविजेता कर्णधार वेस्ट इंडिजच्या डॅरेन सॅमीकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती.
2013 मध्ये मुंबई इंडियन्सने जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या रिकी पाँटिंगला काढून रोहित शर्माला ही जबाबदारी दिली होती.
2012 मध्ये देखील डेक्कन चार्जर्सने मधल्या हंगामात श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून व्हाईटला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याची घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT