Relationship Tips in Marathi: रिलेशनशीपमध्ये (Relationship) कधी कधी अशी वेळ येते जेव्हा नात्यामध्ये एक जोडीदार(Partner) दुसऱ्याकडे दुर्लक्ष करतो. जोडीदाराच्या दुर्लक्ष करणे नेहमी समजून घेणे अवघड असते कारण कित्येकवेळा मोकळेपणाने आपल्या भावना(Feelings) व्यक्त करत नाही. तुम्ही जर एखाद्यावर जीवापाड प्रेम करत असाल आणि तुमच्याकडे दुर्लक्ष (Ignore)करत असेल त्यामागे काही कारण असून शकतात. जाणून घ्या नात्यामध्ये अशी वेळ का येते?
कोणत्याही गोष्टीवर चिडून बसणे
कित्येकदा विचार न करता आपण असे काही तर बोलून जातो जे जोडीदाराला आजिबात आवडत नाही. त्यामुळे कित्येक वेळा आपल्यावर चिडतात. अशा वेळी ते त्यांचा रुसवा तुमच्याकडे दुर्लक्ष करून व्यक्त करतात. विशेषत: मुलींना रुसवा दाखविण्यासाठी दुर्लक्ष करण्याचा पर्याय निवडतात.
तुमचे लक्ष स्वत:कडे वेधण्यासाठी -
कित्येक वेळा जोडीदार तेव्हा दुर्लक्ष करतो जेव्हा तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. . अनेक वेळा असे होते की, नात्यामध्ये असताना काही वेळाने लोक आपल्या पार्टनरकडे जास्त लक्ष देत नाही, वेळ देत नाही. अशा वेळी तुमचे लक्ष स्वत: कडे वेधण्यासाठी (Attention) तुमचा पार्टनर तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकतो.ME Time हवा असतो
मूड स्विंग्स हे देखील कारण आहे की बरेच लोक आपल्या जोडीदाराकडे गरजेकडे दुर्लक्ष करतात. त्यांना स्वत:सोबत काही निवांत वेळ घालवयाचा असतो. अशा वेळी तेम मेसेज कॉल देखील रिप्लाय देत नाही. अशा वेळी त्यांच्यासोबत राहा आणि त्यांना स्वत:साठी हवा तितका वेळ द्या.तिसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या येण्यामुळे : जेव्हा पार्टनर विनाकारण बराच काळ तुमच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर त्यामागे एक कारणे हे देखील असून शकते त्यांच्या आयुष्यामध्ये कोणाची तरी आली आहे. असे असून शकते तुमच्या जोडीदारा कोणीतरी तिसरी व्यक्ती आवडत असेल आणि तुमच्यासोबत राहण्यात त्यांना आता इंटरेस्ट असेल सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.