राजधानी काबूलमधील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर (Hamid Karzai International Airport) गुरुवारी दोन आत्मघाती हल्ले झाले.
काबूल (अफगाणिस्तान) : तालिबान्यांनी (Taliban) अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यापासून या देशात सर्व काही बदललं आहे. राजधानी काबूलमधील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर (Hamid Karzai International Airport) गुरुवारी दोन आत्मघाती हल्ले झाले. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, या हल्ल्यात आत्तापर्यंत 90 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत, तर 150 हून अधिक जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, काबुल विमानतळावरील टेलीग्राम अकाउंटवर झालेल्या घातक दुहेरी हल्ल्याची जबाबदारी इसिस ISIS या दहशतवादी संघटनेच्या खोरासन ग्रुपने (ISIS-K) घेतलीय.अलीकडेच, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी असा इशारा दिला, की इसिसचे दहशतवादी काबूल विमानतळावर हल्ला करण्याचा कट रचत आहेत. या इशाऱ्यानंतर अफगाणिस्तान विमानतळावर सुरक्षेत तैनात असलेल्या अमेरिकन सैनिकांना पूर्वीपेक्षाही अधिक सतर्क करण्यात आले. या दहशतवादी हल्ल्याचा इशारा पाहता, अनेक देशांनी तेथून आपल्या लोकांना बाहेर काढण्याची योजनाही बंद केली होती.1999 मध्ये स्थापन झालेल्या आयएसआयएसची जगाला 2014 पासून ओळख झाली. इसिसची एक शाखा, आयएसआयएस-खोरासनची स्थापना तालिबानच्या पाकिस्तानी सहयोगीच्या असंतुष्ट सदस्यांनी जानेवारी 2015 मध्ये केली. हा तालिबान आणि अमेरिकेचा कट्टर शत्रू मानला जातो. 'खोरासन' हा शब्द प्राचीन प्रदेशाच्या नावावर आधारित आहे, ज्यात एकेकाळी उज्बेकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि इराकचा भाग समाविष्ट होता. सध्या हा अफगाणिस्तान आणि सीरियाच्या सीमेचा भाग आहे.इसिसचा पाया 2006 मध्ये बगदादीने घातला होता. प्रदीर्घ लढाईनंतर अमेरिकेने इराकला सद्दाम हुसेनच्या तावडीतून मुक्त केले. पण, हे स्वातंत्र्य मिळवताना इराक पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. अमेरिकन सैन्य इराकमधून बाहेर पडताच, अनेक लहान गट त्यांच्या ताकदीसाठी लढू लागले. त्यापैकी एका गटाचा नेता अबू बकर अल-बगदादी होता, जो अल-कायदा इराकचा प्रमुख होता. तो 2006 पासून इराकमध्ये आपली जमीन तयार करण्यात गुंतला होता. पण, नंतर त्याच्याकडे ना पैसा राहिला, ना कोणती लढाऊ विमान, त्यामुळे तो पूर्णता कंगाल झाला.संसाधनांच्या अभावामुळे बगदादीला फारसे यश मिळवता आले नाही. तथापि, इराकवर कब्जा करण्यासाठी, तोपर्यंत त्याने अल कायदा इराकचे नाव बदलून नवीन नाव 'ISI' म्हणजेच इस्लामिक स्टेट ऑफ इराक असे ठेवले होते.बगदादी सद्दाम हुसेनच्या सैन्यातील कमांडर आणि सैनिकांमध्ये सामील झाला. यानंतर, त्याने पोलिस, लष्कराची कार्यालये, चौक्या आणि भरती केंद्रे लक्ष्य बनवायला सुरुवात केली. बगदादीसोबत हजारो लोक होते, पण तरीही बगदादीला इराकमध्ये यश मिळत नव्हते.इराकमध्ये न मिळालेल्या यशामुळं निराश होऊन बगदादीनं सीरियाकडे वळण्याचा निर्णय घेतला. सीरिया त्यावेळी गृहयुद्धाला सामोरे जात होते. अल कायदा आणि फ्री सीरियन आर्मी हे तिथले दोन मोठे गट होते. जून 2013 मध्ये, फ्री सीरियन आर्मीचे जनरल पुढे आले आणि त्यांनी जगाला प्रथमच आवाहन केलं, की जर त्याला शस्त्रे मिळाली नाहीत, तर तो एका महिन्याच्या आत बंडखोरांशी युद्ध हरेल, असं सांगितलं. त्यानंतर एका आठवड्याच्या आत अमेरिका, इस्रायल, जॉर्डन, तुर्की, सौदी अरेबिया आणि कतार यांनी फ्री सीरियन सैन्याला शस्त्र, पैसा आणि प्रशिक्षण मदत देणं सुरू केलं. या देशांनी सर्व आधुनिक शस्त्रे, टँकविरोधी क्षेपणास्त्रे, दारुगोळा सीरियामध्ये आणला आणि तिथेच इसिस उद्धवस्त झाली.फ्री सीरियन आर्मीसाठी असलेली शस्त्रं एका वर्षात इसिसकडे पोहचली. कारण, तोपर्यंत आयएस फ्री सीरियन आर्मीमध्ये मोडली होती. येथूनच IS-K ची दहशत वाढली. आयएसआयएस-खुरासनने यापूर्वीही अफगाणिस्तानात अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. दहशतवादी संघटनेने मे महिन्यात काबुलमधील मुलींच्या शाळेवर झालेल्या भीषण स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती, ज्यात 68 लोक ठार झाले, तर 165 जण जखमी झाले होते. इसिस-खुरासनने जूनमध्ये ब्रिटिश-अमेरिकन हॅलो (HALO) ट्रस्टवरही हल्ला केला, त्यात 10 लोक ठार झाली आणि 16 जण जखमी झाले होते.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.