jackfruit 5-health-benefits
उन्हाळ्यात जे पदार्थ आवर्जून खाल्ले जातात त्यामध्ये फणस आवडीने खाल्ला जातो. देशभरात या काळात फणसाचे विविध पदार्थ केले जातात. त्याचे जसे आहारात विविध पदार्थ केले जातात तसेच त्यातल्या पोषकतत्वाचे शरीराला फायदे होतात. आहारतज्ज्ञ उन्हाळ्यात म्हणूनच फणस खाण्याचा सल्ला देतात.उन्हाळ्यात फणस खाल्लाने ५ प्रकारचे फायदे होतात.
मधुमेहावर नियंत्रण- रक्तात असणाऱ्या उच्च पातळीच्या साखरेमुळे होणाऱ्या मधुमेहामध्ये फणस खाणे अतिशय फायदेशीर मानले जाते. फणसात असलेलेल फायबर शरीरातील ग्लुकोज आणि इन्सुलिनचे उत्सर्जन कमी करते. तसेच भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांची साखरेची पातळी नियंत्रणात राहते.रोगप्रतिकारकशक्ती वाढते- हवामानात बदल होत असताना अनेक आजार डोकं वर काढतात. या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी फणस खूप प्रभावी आहे. आहारातील फायबर, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, जस्त आणि फॉस्फरस यांसारखे पोषक घटक, जीवनसत्त्वे-ए, सी, बी, रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. तसेच ते रोगांशी लढतात.वजन कमी करणे- फणसात कॅलरी कमी आणि फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे तो पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. तसेच आपली भूकही बराच काळ नियंत्रणात राहते. तसेच फणस खाल्ल्याने मेटाबॉलिक रेटही वाढतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फणस खाल्ल्याने खूप फायदा असल्याचे मानले जाते. हाडे मजबूत हाडे मजबूत- आरोग्य तज्ञांच्या मते, फणस हा कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे. तो आपली हाडे मजबूत करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. याशिवाय व्हिटॅमिन-सी आणि मॅग्नेशियमही फणसात आढळते. हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम शोषण्यास यामुळे मदत होते. झोपेसाठी आवश्यक - निद्रानाशावरही फणस फायदेशीर आहे, याची अनेकांना कल्पना नाही. यामध्ये असलेले मॅग्नेशियम शरीरातील न्यूरोट्रांसमीटरची पातळी नियंत्रित करण्याचे काम करते. यामुळे मज्जातंतूंना विश्रांती मिळते. त्यामुळे चांगली झोप लागते. उन्हाळ्यात आपल्या आहारात नियमितपणे फणसाचे पदार्थ खाल्यास आपल्या झोपण्याचे चक्र सुधारू शकते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.