नियाभरमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे अनेक मसाले पहायला मिळतात. मात्र, येथे सर्व मसाल्यांची किंमत वेगळी असते. हे मसाले त्यांच्या उत्कृष्ट चवीसाठी आणि वेगवेगळ्या कारणांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत.
नियाभरमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे अनेक मसाले पहायला मिळतात. मात्र, येथे सर्व मसाल्यांची किंमत वेगळी असते. हे मसाले त्यांच्या उत्कृष्ट चवीसाठी आणि वेगवेगळ्या कारणांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत.आम्ही तुम्हाला अशाच एका मसाल्याबद्दल सांगणार आहोत, जो जगातील सर्वात महागडा मसाला आहे. बाजारात या मसाल्याची किंमत एवढी आहे, की ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.जगात सर्वात महाग विकल्या जाणाऱ्या या मसाल्याला लोक 'रेड गोल्ड' (Red Gold) असंही म्हणतात. या मसाल्याबद्दल सर्वांना माहितीय. सध्या बाजारात केशर (Saffron) हा सर्वात महागडा मसाला आहे. एक किलो केशरची किंमत 2.5 लाख ते 3 लाख रुपये आहे. चला जाणून घेऊया, या मसाल्यामध्ये असं काय आहे, ज्यामुळं हा जगातील सर्वात महागडा मसाला आहे.केशराची किंमत हिऱ्यासारखी असण्याची अनेक कारणं आहेत. याच्या दीड लाख फुलांपासून फक्त एक किलो केशर निघतं, असं म्हणतात. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याच्या एका फुलातून फक्त तीनच केशर मिळतात.तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की केशरचं रोप देखील खूप महाग विकलं जातं. केशर वनस्पती ही जगातील सर्वात महागडी वनस्पती असल्याचं म्हटलं जातं. जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) काही भागात केशराची लागवड केली जाते.केशराची पहिली लागवड कुठे झाली, याची माहिती कोणाकडं नाही. पण, असं म्हटलं जातं की, सुमारे 2300 वर्षांपूर्वी ग्रीसमध्ये अलेक्झांडरच्या सैन्यानं प्रथम लागवड केली होती. मसाल्यांव्यतिरिक्त अनेक गोष्टींमध्ये केशर वापरला जातो. केशर आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.