Subedar Vijay Shinde esakal
शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील हजारोंचा जनसागर लोटला होता.
विसापूर (सातारा) : लडाख (Ladakh Accident) प्रदेशात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या सुभेदार विजय सर्जेराव शिंदे (Subedar Vijay Shinde) यांच्या पार्थिवावर आज विसापूर (ता. खटाव) इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील नागरिक व आजी-माजी सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.२६ जवानांचे परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उपसेक्टर हनिफच्या फॉरवर्डकडे जात असताना लष्कराचे (Indian Army) वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत शुक्रवारी (ता. २७) सकाळी ९ वाजताच्या सुमारास पडले.या अपघातात विजय शिंदे यांच्यासह आणखी सहा जवानांना वीरमरण आल्याचे समजताच विसापूरसह तालुक्यात शोककळा पसरली होती. सुभेदार शिंदे यांचे पार्थिव लडाखमधून पुण्यापर्यंत सैन्यदलाच्या विमानाने आणण्यात आले.आज सकाळी दहा वाजता पार्थिव विसापूरमध्ये पोहोचल्यानंतर दुपारी दीड वाजता विजय शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी, तसेच शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील हजारोंचा जनसागर लोटला होता.सुरुवातीला पार्थिव घरी पोचताच विजय शिंदे यांच्या कुटुंबीय, नातेवाइकांनी हंबरडा फोडला. यावेळी अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्यानंतर श्री वाघेश्वरी मंदिराशेजारील चावडी चौकात स्टेजवर सुभेदार विजय शिंदे यांचे पार्थिव सर्वांकरता दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), खासदार श्रनिवास पाटील (Shrinivas Patil), आमदार महेश शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव तहसीलदार किरण जमदाडे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर विजय शिंदे यांची सजविलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली. दरम्यान, संपूर्ण गावातील रस्त्यांवर आकर्षक रांगोळी, पुष्पवृष्टी करण्यात आली. वीर जवान विजय शिंदे अमर रहे चे चौका-चौकात फ्लेक्स बोर्ड मोठ्या संख्येने लावण्यात आले होते. विजय शिंदे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात विजय यांना अखेरचा निरोप देण्यात आला. बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देत, शासकीय इतमामात सुभेदार विजय शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूपश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.आज सकाळी दहा वाजता पार्थिव विसापूरमध्ये पोहोचल्यानंतर दुपारी दीड वाजता विजय शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी, तसेच शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील हजारोंचा जनसागर लोटला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.