marriage natasha and alan esakal
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाह आज पार पडला. अत्यंत साधेपणाने त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहाचा कार्यक्रम उरकला. कुटुंबाच्या काही लोकांच्या उपस्थितीतच विवाह सोहळा पार पडला.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: आपल्या लेकीच्या लग्नातील खास क्षण सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी "जा मुली जा...दिल्या घरी तू सुखी रहा..."अशा भावना व्यक्त केल्या. मुलगी नताशा आणि जावई अलान यांना शुभेच्छा देताना ते भावनिक आणि अस्वस्थ झाल्याचे दिसून आले.
यादरम्यान, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हा विवाह अत्यंत साधेपणाने उरकल्यामुळे अनेकांनी त्यांच कौतुक केलं आहे. "नेता केवळ नेतृत्व करत नाही तर समाजोपयोगी संदेश ही आपल्या कृतीतून दाखवून देत असतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब यांनी घडवून आणलेला आपल्या एकुलत्या एका मुलीचा विवाह सोहळा...अत्यंत साधेपणा, कोणताही बडेजाव नाही कसलाही चंगळवाद नाही." अशा शब्दात लोकांनी या विवाह सोहळ्याचे कौतुक केले. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.