जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : तब्बल दोन वर्षानंतर दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेला उद्या सुरुवात होणार आहे. यासाठी डोंगरावर कडक सुरक्षा व्यवस्था यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.जलद कृती, दल व्हाईट आर्मी तसेच सेवाभावी संस्थांचे जवान यांची पथके डोंगरावर सज्ज ठेवली आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी डोंगरावर यात्रेची पाहणी केली.
सलग चार दिवस शासकीय सुट्टी असल्यामुळे यंदा या यात्रेत गर्दीचा उच्चांक गाढण्याची शक्यता आहे.सुमारे दहा लाखांवर भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे.जिल्हाधिकारी यांनी सर्व शासकीय विभागांना खडसावून सांगितले. त्यांनी आज गावात रस्ते दर्शन रांग मंदिर परिसराची पाहणी केली. कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाट, वडणगे, निगवे, कुशीरे, पोहाळे, गिरोली, दाणेवाडी या भागातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले. हालगी, सनई, पिपाणीच्या सुरामध्ये सासनकाठ्या नाचत डोंगराकडे रवाना झाल्या. या भागातील ग्रामस्थांनी भाविकांना पिण्याचे पाणी चहा नाष्टा तसेच प्रसादाची व्यवस्था केली. डोंगरावर पाडळी (निनाम )सातारा, विहे-पाटण, किवळ-कराड, कसबे डिग्रज,मिरज, कसबा सांगाव, दरवेश पाडळी, मनपाडळे, सांगलवाडी यांच्यासह इतर मानाच्या सर्व सासनकाठया मूळमाया यमाई मंदिर परिसरात दाखल झाल्या. यावेळी त्यांचे स्वागत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, अधीक्षक दीपक मेहतर तसेच देवस्थानचे कर्मचारी यांनी केले. त्यांना मानाचा विडा दिला त्यानंतर या सासनकाठ्या शासकीय विश्रामगृह नवीन वसाहत पाणीटाकी मार्गे दक्षिण दरवाजातून मुख्य मंदिरात गेल्या. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.