Bollywood's Controversial Movies esakal
काली चित्रपटाच्या पोस्टरवरुन वाद वाढत चालला आहे. चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलई यांच्या या डाॅक्युमेंट्रीच्या पोस्टरमध्ये महाकाली सिगारेट ओढताना दाखवली गेली आहे. त्या बरोबरच कालीच्या भूमिकेत असलेल्या महिलेच्या हातात एलजीबीटीक्यूचा झेंडा दिसत आहे. पोस्टर समोर आल्यानंतर त्यावर चहू बाजूंनी टीक होते आहे. तसेच बंदी घालण्याची मागणी होत आहे. या व्यतिरिक्त चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलईवर अनेक ठिकाणी एफआयआरही नोंदवले गेले आहेत. मात्र काली हा पहिलाच चित्रपट नाही जो हिंदू देव-देवीतांचे अपमानामुळे चर्चेत आला. यापूर्वीही अनेक चित्रपट-वेब सीरिज अशा वादाला सामोरे गेले आहेत. चला तर जाणून घेऊन त्या चित्रपट आणि वेब सीरिजविषयी...
लुडो : ओटीटीवर प्रदर्शित झालेला अनुराग बसू यांचा चित्रपट लुडोतील एका सीनवरही लोकांनी धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप केला होता. चित्रपटातील एका दृश्यात सोंग घेतलेल्या तिघांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेशच्या वेशात रस्त्यावर नृत्य आणि उड्या मारल्याचे दिसले होते. इतकेच नव्हे तर एका दृश्यात भगवान शंकर आणि महाकाली वाहनाला धक्का देताना दाखवण्यात आले होते.
तांडव : सैफ अली खानची भूमिका असलेली वेब सीरिज तांडवमध्येही हिंदू देव-देवीतांचा अपमान केला गेला होता. यातील काही दृश्यांवर वाद सुरु झाला होता. सीरीजच्या एका दृश्यात महाविद्यालयाच्या नाटकात भगवान शिव यांच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र या नाटकात देवाची भूमिका निभावणाऱ्या कलाकराची वेशभूषा आणि त्यांच्या संवादावर लोकांनी तीव्र आक्षेप नोंदविला होता. याबरोबरच हिंदू देव-देवीतांचे अपमान करण्यासाठी तिच्यावर बंदी घालण्याची मागणी केली गेली होती.
पीके : वर्ष २०१४ मध्ये आलेली आमिर खान आणि अनुष्का शर्माची भूमिका असलेल्या पीके चित्रपटावरुन त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटावरही हिंदू देव-देवीतांची टिंगल केली गेल्याचा आरोप लावला गेला होता. चित्रपटात एका दृश्यात भगवान शंकराची भूमिका करणारा व्यक्ती भीतीमुळे स्वच्छतागृहात इकडून-तिकडे पळताना दाखवण्यात आला होता.
ए सुटेबल बाॅय : वेब सीरिज ए सुटेबल बाॅयही वादात अडकली होती. वास्तविक सीरिजच्या एका दृश्यात मंदिर प्रांगणात अश्लील सीन चित्रित करण्यात आले होते. त्यानंतर त्या सीनवर लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्याचा आरोप लावला गेला होता. या सीरीजचा हिंदू संघटनांनी जोरदार विरोध केला होता.
सेक्सी दुर्गा : चित्रपट सेक्सी दुर्गाच्या शीर्षकावरुन मोठा वादंग पेटला होता. चित्रपटाच्या नावात दुर्गाबरोबर सेक्सी शब्दाचा वापर केल्याने लोकांनी यास देवी दुर्गाचा अपमान झाल्याचे म्हणाले. त्यानंतर चित्रपटाच्या नावावरुन वाढता वाद पाहाता त्याचे नाव एस दुर्गा असे ठेवले गेले होते. लक्ष्मी बाॅम्ब : अभिनेता अक्षय कुमार याचा चित्रपट लक्ष्मी आपल्या नावामुळे बराच वादात अडकला होता. वास्तविक चित्रपटाचे नाव अगोदर लक्ष्मी बाॅम्ब ठेवले गेले होते. मात्र देवी लक्ष्मीचे नावाबरोबर बाॅम्ब शब्दाचा वापरावर हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला होता. हा माता लक्ष्मीचा अपमान असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे चित्रपटाचे नाव बदलून लक्ष्मी असे करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.