Kannada Vedike Organization esakal
बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी हैदोस घातला असून मंगळवारी सकाळपासूनच वातावरण बिघडण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.
बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी हैदोस घातला असून मंगळवारी सकाळपासूनच वातावरण बिघडण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. तसंच काही वेळापूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील हिरे बागेवाडी जवळ महाराष्ट्र राज्यातील वाहनांना लक्ष करण्यात आलं असून वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारनं सीमा समन्वयक मंत्र्यांची नेमणूक केल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई बेळगावला येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संवाद साधणार होते. मात्र, समोर एक मंत्री बेळगावात येऊ नये यासाठी गेल्या चार ते पाच दिवसांपासून कन्नड संघटनांनी संपूर्ण बेळगाव शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.तसंच सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगाव जिल्ह्यात बंदीचा आदेश बजावल्यानंतर देखील कन्नड संघटना जाणीवपूर्वक मराठी भाषिकांना लक्ष करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कन्नड संघटनांनामुळं शहराचं वातावरण बिघडू नये यासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी राष्ट्रीय महामार्ग आणि इतर ठिकाणी कन्नड संघटना जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करीत असून हिरे बागेवाडी इथं महाराष्ट्र राज्यातील ट्रक व इतर वाहनांवर चढून धिंगाणा घालण्यात आला. तसंच लाल पिवळे झेंडे फडकून महाराष्ट्र सरकार आणि मराठी भाषिकांविरोधात गरळ ओखण्याचं काम कन्नड संघटनांनी केलं आहे. या प्रकारामुळं मराठी भाषिकातून एकच संताप व्यक्त केला जात आहे.तसंच कन्नड संघटनाना वेळीच रोखावे, अन्यथा मराठी भाषिक जशास तसे उत्तर देतील असा इशारा देण्यात आला आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.