Karnataka Rajyotsava Black Day Belgaum esakal
66 वर्षांनंतर ही महाराष्ट्रात जाण्याची इच्छा तीव्र असल्याचं या फेरीतून दिसून येत आहे.
बेळगाव : भाषिक प्रांतरचना करताना झालेल्या अन्यायाविरोधात हजारो मराठी भाषिक आज (मंगळवार) रस्त्यावर उतरले असून संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात येत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीनं (Maharashtra Ekikaran Samiti) मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाविरोधात हजारोंच्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन करण्यात केलं होतं. याला प्रतिसाद देत बालचमूंसह आबालवृध्द मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत. तसेच बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मैं नहीं तो जेल मैं, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात येत आहे.66 वर्षांनंतर ही महाराष्ट्रात जाण्याची इच्छा तीव्र असल्याचं या फेरीतून दिसून येत आहे. सकाळी नऊ वाजता फेरीला सुरुवात झाली असून काळ्या दिनाच्या फेरीत काळे टी शर्ट, काळे कपडे घालून सहभागी झाले आहेत. त्यामुळे समितीची ताकद पुन्हा एकदा दिसून आली. शहराच्या विविध भागातून फेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर मराठा मंदिर इथं भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. (फोटो : मिलिंद देसाई)ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.