बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड.. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे लग्नानंतर केवळ पतीसोबतच नाही तर सासरच्या मंडळींसोबतही वाद झाले. यापैकी काहींनी कोर्टात तर काहींनी उघडपणे माध्यमांसमोर राग व्यक्त केला.
कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह आणि गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. सुनीता आणि कश्मीरा यांच्यात अनेकदा शाब्दिक बाचाबाची झाली. या दोन्ही कुटुंबीयांमध्ये कटुता आल्यानंतर आता कृष्णा आणि गोविंदा एकत्र झळकण्यासही स्पष्ट नकार देतात. रागाच्या भरात कश्मीराने सुनीता यांना सुनावलं होतं. तर सुनीत यांनीसुद्धा उलट उत्तर देत 'आम्ही आमच्या घरात वाईट सून आणली' असं म्हटलं.
प्रसिद्ध टीव्ही कलाकार निशा रावल आणि करण मेहरा यांच्या वैवाहिक आयुष्यातही अनेक समस्या आहेत. निशाने करणविरोधात एफआयआर दाखल करताना त्यात सासू-सासरे यांच्याही नावाचा उल्लेख केला होता. निशाने करणच्या भावावरही आरोप केले आहेत.
अमृता सिंग आणि सैफ अली खानच्या लग्नामुळे शर्मिला टागोर खुश नव्हत्या, असं म्हटलं जातं. याबाबत खुद्द सैफ आणि अमृता यांनी काही मुलाखतींमध्ये खुलासा केला होता.
करीश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या घटस्फोटाचा वाद सुरु असताना दोघांनी एकमेकांच्या कुटुंबीयांवर अनेक आरोप केले होते. करीश्माने संजयच्या आईवडिलांवरही कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता.
श्रीदेवी यांनी जेव्हा बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं, तेव्हा बोनी कपूर यांच्या आईचाही लग्नाला विरोध होता. बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना यांचाच त्यांनी सून म्हणून स्वीकार केला होता.
किशोर कुमार यांनी जेव्हा मधुबालासोबत लग्न केलं होतं, त्यावेळी किशोर कुमार यांच्या कुटुंबीयांनी मधुबाला यांचा सून म्हणून स्वीकार करण्यास नकार दिला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.