Travelling during Omicron Sakal
कोरोना व्हायरसचं नवं व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे (Omicron) जगभरातील अनेक देशात चिंता वाढली आहे. देशात कोरोनाच्या केसेस प्रचंड वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत अनेक निर्बंध लावले आहेत. या काळातही काही लोकांना कामानिमित्त किंवा महत्त्वाच्या कामानिमित्त प्रवास करावा लागतो. अशावेळी जे लोक सावधगिरी बाळगणार नाहीत, त्यांच्यामुळे त्यांचा स्वतःचा तसेच त्यांच्या कुटूंबीयांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे ज्या लोकांना या काळात प्रवास करावा लागत आहे. त्यांनी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. (Tips to keep yourself safe while travelling during corona)
1. मास्क (Mask)- प्रवासाला जातेवेळी मास्क जरूर वापरा. प्रत्येक मास्क वापरायची एक मर्यादा असते. त्यामुळे आपला मास्क बदलत रहा.2. हॅण्ड वॉश (Hand Wash)- कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी आपले हाथ वेळोवेळी धुवा. सॅनिटायजर उपलब्ध नसेल तर तुम्ही हात साफ करण्यासाठी साबणसुद्धा वापरू शकता.3. सोशल डिस्टन्स (Social Distance)- प्रवासादरम्यान सुरक्षित अंतर राखलं गेलं पाहिजे. जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला हवं. 4. सीट सॅनिटायझर करा (Sanitize seats while travelling)- जर तुम्ही ट्रेन किंवा बसने प्रवास करत असाल तर तुमची सीट सॅनिटाइज करा. 5. हॅण्ड सॅनिटायजर (Hand Sanitizer)- हॅण्ड सॅनिटायजर नेहमी सोबत बाळगा आणि त्याने हात सॅनिटाइज करत रहा.6. बाहेरचं अन्न टाळा (Avoid outside Food)- यात्रेदरम्यान अन्नाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रवास करतेवेळी शक्य असल्यास जेवण घरूनच सोबत न्यावे.7. टॉयलेट वापरताना रहा सावध (Be careful when use toilet)- यात्रेदरम्यान टॉयलेट वापरताना खूप सावधगिरी बाळगायला हवी. टॉयलेट फ्लश बटन आणि नळाला सॅनिटाइज केल्यांनंतरच स्पर्श करा. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.