दररोज स्वयंपाक (Kitchen) करून कधी-कधी कंटाळा येतो. आता काहीच नको करायला अशी मानसिकता होते. अशावेळी काही ट्रिक्सचा वापर केलात तर तुम्हाल कंटाळा ही येणार नाही आणि भूकही शमेल. त्यातच आता उन्हाळा आला आहे. थंड पिण्याची इच्छा होते. अशावेळी फटाफट लिंबाचा सरबत कसा बनवावा, यासाठी कोणती ट्रिक्स वापरायची जाणून घेऊया.
तुम्ही जर रोजच्या घाई-गडबडीत स्वयंपाक बनवत असाल आणि तुमची चपाती, रोट्या, पुर्या किंवा पराठे कडक होत असतील तर पीठ मळताना थोडी साखर घाला. तसेच पिठ मळताना दुधात ही मिसळू शकता. उन्हाळ्याच्या दिवसात दूध खराब होते अशावेळी तुम्ही पीठ मळण्यासाठी त्या पाण्याचा वापर करू शकता.त्यामुळे पराठे आणि पुरी मऊ होतेच शिवाय चव ही छान लागते.तुम्हाला जर हाॅटेल सारखे फ्रेंच फ्राईज घरी बनवायचे असतील तर तुम्ही बटाटे कापून २ ते ३ मिनिटे पाण्यात उकळा. त्यानंतर ते रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा. आता या बटाट्याला कॉर्नफ्लोअरने धुवून एअर टाईट कंटेनर किंवा लॉक बॅगमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. तुम्हाला जेव्हा खायचे असेल तेव्हा तळून खावू शकता.
इडली करायची असली की त्याला एक दिवस आधी मिश्रण भिजवावे लागते. मगच दुसऱ्या दिवशी आपण इडली खावू शकतो. मात्र जर तुम्हाला झटपट इडली खायची असेल तर तुम्ही रव्याच्या मदतीने इडली बनवू सकता.
रव्यात दही आणि इनो मिक्स करा. हे मिश्रण १५ मिनिटे तसेच राहू द्या. थोड्यावेळाने गरम गरम इडली बनवू शकता.
भाजी करताना ती कधी-कधी खूपच पातळ होते. अशावेळी त्यात चिरलेला टोमॅटो, आले-लसूण चिरून किंवा पेस्ट करून घाला. तुम्ही ही पेस्ट तयार करून फ्रिजला ठेवू शकता. म्हणजे गडबडीच्यावेळी तुम्हाला याचा वापर करता येईल.उन्हाळा सुरु झाला की सतत थकवा जाणवतो. मग पाणी आणि थंडगार पेयांना पसंती दिली जाते. तुम्हाला झटपट लिंबूपाणी पिण्याची इच्छा असेल तर यासाठी आधिच तयारी करू शकता. यासाठी १ कप पाण्यात २ कप साखर आधीच विरघळवून घ्या. त्यानंतर बर्फाच्या ट्रेमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा लागेल तेव्हा त्याचा वापर करा.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.