आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजूनही भारतातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, असे एका सर्व्हेक्षणानुसार नुकतेच समोर आले आहे. त्यावरून त्यांच्यावर अनेकदा टीका-टिप्पणी देखील झाली. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...
काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे दररोज १८ तास काम करतात आणि कधीही सुट्टी घेत नाहीत. तसेच ते नियमित दिनचर्या आणि संतुलित आहाराकडे देखील विशेष लक्ष देतात. त्यामुळे ते इतके फीट दिसतात.मोदी मुख्यमंत्री असताना अनेकदा त्यांच्या हाती आयफोन दिसायचा. तसेच त्यांचे जगभरातील बड्या नेत्यांसोबतचे सेल्फी काढतानाचे फोटोदेखील आहेत.पंतप्रधान मोदी आयफोन वापरतात. मात्र, ते कुठलं सीमकार्ड वापरतात हे तुम्हाला माहिती आहे का? दोन वर्षांपूर्वी त्यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला होता. त्यामध्ये ते वोडाफोनचं सीमकार्ड वापरत असल्याचं दिसून आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आवडणाऱ्या घड्याळाची माहिती त्यांच्या आत्मचरित्रामध्येच दिली होती. मोवाडो (Movado) या स्वीझ लक्झरी ब्रॅण्डची घड्याळे मोदींना आवडतात. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे शाकाहारी असून त्यांना साधं गुजराती जेवण आवडतं. पंतप्रधान मोदींना मसाले नसलेला संतुलित आहार आवडतो. तसेच ते भात, वरण, भाजी आणि दही याचा त्यांच्या आहारात समावेश असतो. नाश्त्यामध्ये पोहे आवडतात, याशिवाय गुजरात खांडवी, खिचड़ी, कढ़ी, उपमा, खाकरा देखील त्यांना आवडतो. उपवास केल्याने शरीर सुदृढ राहते, असे मोदी मानतात असंही त्यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळे नवरात्रीमध्ये मोदी पूर्ण ९ दिवस उपवास करतात. यावेळी ते फक्त लिंबू पाणी पितात अशीही माहिती आहे.पंतप्रधान मोदींना त्यांना Mont Blanc माँट ब्लन्क या जर्मन कंपनीचे पेन खूप आवडतात. मोदी हाच पेन वापरतात. पंतप्रधान मोदींच्या कपड्यांची चर्चा नेहमीच होते. तसेच अनेकजण त्यांची फॅशन फॉलो करताना दिसतात. २०१४ मध्ये त्यांच्यामुळे 'मोदी कोटी'ची फॅशन आली होती. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.