इतिहासात अनेक भयंकर युद्धं झाली आहेत. ज्यात लाखो लोकांनी आपला प्राण गमावलाय. सुमारे 65 वर्षांपूर्वी असेच एक युद्ध झाले होते.
इतिहासात अनेक भयंकर युद्धं झाली आहेत. ज्यात लाखो लोकांनी आपला प्राण गमावलाय. सुमारे 65 वर्षांपूर्वी असेच एक युद्ध झाले होते. जे 'व्हिएतनाम' युद्ध म्हणून देखील ओळखले जाते. शीतयुद्धाच्या काळात व्हिएतनाम (Vietnam), लाओस (Laos) आणि कंबोडियाच्या (Cambodia) धरतीवर हे महाभयंकर युध्द सुरु होतं. साधारण 20 वर्षे चाललेला हा लढा 1955 सालापासून सुरू झाला आणि तो 1975 मध्ये समाप्त झाला. हे युद्ध उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनामच्या सरकारमध्ये चाललं होतं. याला 'दुसरे भारत-चीन युद्ध' (India-China war) देखील म्हटलं जातं.या भयंकर युद्धात उत्तर व्हिएतनामच्या सैन्याला चीनच्या पीपल्स रिपब्लिक आणि इतर कम्युनिस्ट देशांनी पाठिंबा दर्शविला होता, तर दुसरीकडे दक्षिण व्हिएतनामचे सैन्य खांद्याला खांदा लावून अमेरिका आणि मित्र देशांच्या बाजूने लढाई लढत होते. 'लाओस'सारख्या छोट्या देशानं उत्तर व्हिएतनामच्या सैन्यास (Vietnam soldiers) आपल्या धरतीवर लढायला परवानगी दिली, तेव्हा या युद्धानं आणखी भयंकर रुप धारण केलं होतं.या प्रकारामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आणि लाओसला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेनं हवाई हल्ल्याची योजना आखली. अमेरिकन हवाई दलाने आग्नेय आशियातील लाओस या छोट्याशा देशावर इतके बॉम्ब टाकले की, असे म्हणतात.. लाओसचे भविष्य बॉम्बच्या (Bomb) ढिगाऱ्याखाली दफन झाले.असेही म्हटले जाते, की अमेरिकेने 1964 ते 1973 पर्यंत संपूर्ण नऊ वर्ष लाओसमध्ये दर आठ मिनिटांनी बॉम्ब सोडले. एका अहवालानुसार, अमेरिकेने दररोज दोन दशलक्ष डॉलर्स (आजच्या हिशोबानुसार 15 कोटी रुपये) केवळ लाओसवरील बॉम्ब हल्ल्यात खर्च झाले होते.माध्यमांच्या वृत्तानुसार 1964 ते 1973 पर्यंत अमेरिकेने व्हिएतनामवर सुमारे 260 दशलक्ष म्हणजे, 26 कोटी क्लस्टर बॉम्ब डागले होते, जे इराकवर गोळीबार झालेल्या एकूण बॉम्बपेक्षा 210 दशलक्ष म्हणजे, 21 करोडपेक्षा जास्त होते. एका अंदाजानुसार, या भयंकर युद्धात 30 लाखाहून अधिक लोक मरण पावले. ज्यात 50 हजाराहून अधिक अमेरिकन सैनिकांचाही सहभाग होता.या युद्धात अमेरिकेचा पराभव झाला, असं म्हटलं जातं. तर 20 वर्षांपासून चाललेल्या या भीषण युद्धामध्ये कोणीही विजयी झाले नाही, असेही काहींचे म्हणणे होते. मात्र, या युद्धामुळे अमेरिकन सरकारला स्वतःच्या लोकांकडून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या दबावाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे त्यांनी या युद्धातून माघार घेणं पसंत केलं होतं. 1973 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी आपले सैन्य माघार घेतले. त्यानंतर, कम्युनिस्ट मित्रपक्षांच्या समर्थित उत्तर व्हिएतनामी सैन्याने देशातील सर्वात मोठे शहर 'सायगॉन' ताब्यात घेत 1975 मध्ये हे युद्ध समाप्त केले.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.