KDCC Bank Elections Result Esakal
कोल्हापुर : ठरलेल्या कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीचा (KDCC Bank Elections Result) निकाल आज लागला. निकाल ऐकण्यासाठी समर्थकांनी मतमोजणी परिसरात प्रचंड गर्दी केली होती.या निवडणूकीत निवडून आलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. मतपेटीमध्ये अनेक चिठ्ठी मिळाल्या मतदारांनी मतपत्रिके बरोबर चिठ्ठी टाकून प्रशासक नेमा असे सत्ताधारी गटाला सांगितले. दिवसभर निवडून आलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. या क्षणाचे छायाचित्रण केले आहे. छायाचित्रकार मोहन मेस्त्री, नितिन जाधव आणि सकाळचे शहर, जिल्हा बातमीदार यांनी.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज (ता. ७) रमण मळा येथील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात सुरुवात झाली आहे.निवडणूकीच्या पहिल्या फेरीत सुधीर देसाई निवडून आले.यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, गेल्या निवडणुकीत मानसिंग गायकवाड यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव झाला होता. त्याचा वाचपा या निवडणुकीत काढला. युतीच्या माध्यमातून एक पद गायकवाडांच्या घरात जावं अशी सर्वांची इच्छा होती ती आज पूर्ण झाली. अशी भावना माजी आमदार सत्यजित पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.आजऱ्यातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाने मी निवडून आलो. या निवडणुकीत जनशक्ती निधन शक्तीला पराभूत केले आहे. असे प्रतिपादन नवनिर्वाचित सदस्य सुधीर देसाई यांनी केले.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या नागरी बँक-पतसंस्था गटात विरोधी गटाचे उमेदवार अर्जून आबिटकर यांनी एकतर्फी विजय मिळवत या गटातील सत्तारूढ गटाचे उमेदवार आमदार प्रकाश आवाडे यांना धक्का दिला. या गटात श्री. आवाडे यांचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची चर्चा आहे. या गटातील विद्यमान संचालक अनिल पाटील यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तालुका आजरा कोल्हापूरच्या जनतेला नुरा कुस्ती आवडत नाही. आम्हीपण नुरा कुस्ती खेळत नाही. मी कुस्ती मारणारा पैलवान आहे. असा टोला खासदार संजय मंडलिक यांनी विरोधकांना लगावला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भटक्या विमुक्त जाती गटातून सत्तारूढ गटाच्या सौ. स्मिता युवराज गवळी विजयी झाल्या, त्यांनी या गटातील उमेदवार व ‘गोकुळ’ चे माजी संचालक विश्वास जाधव यांचा मोठा मताधिक्यांनी पराभव केला. सौ. गवळी यांना ४ हजार ८८७ तर जाधव यांना २४९५ मते मिळाली. निकाल ऐकण्यासाठी समर्थकांनी मतमोजणी परिसरात प्रचंड गर्दी केली होती.या निवडणूकीत निवडून आलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. मतपेटीमध्ये अनेक चिठ्ठी मिळाल्या मतदारांनी मतपत्रिके बरोबर चिठ्ठी टाकून प्रशासक नेमा असे सत्ताधारी गटाला सांगितले. दिवसभर निवडून आलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. सौ. गवळी ह्या पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil)यांचे कार्यकर्ते युवराज गवळी यांच्या पत्नी आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीत त्या बिनविरोध विजयी झाल्या होत्या, पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे. या निवडणुकीत ऐनवेळी पालकमंत्री पाटील यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि त्यात त्यांनी बाजीही मारली. त्यांच्या रूपाने जिल्हा बँकेत सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ गटातून विजयी झालेले राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व शाहुवाडी विकास संस्था गटातील विजयी उमेदवार रणवीर गायकवाड हे बँकेच्या राजकारणात आमच्यासोबत असतील असा दावा विरोधी पॅनेलचे प्रमुख खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी केला. दरम्यान, निकालानंतर श्री. मंडलिक यांनी रणवीर व डॉ. यड्रावकर यांचे फोनवरून अभिनंदन केले. तालुका आजरा कोल्हापूरच्या जनतेला नुरा कुस्ती आवडत नाही. आम्हीपण नुरा कुस्ती खेळत नाही. मी कुस्ती मारणारा पैलवान आहे. असा टोला खासदार संजय मंडलिक यांनी विरोधकांना लगावला.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद गटातून ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर कार्यकर्ते व सत्तारूढ गटाचे प्रताप उर्फ भैय्या माने हे विजयी झाले. त्यांना 2266 मते मिळाली. तर विरोधी आघाडीचे उमेदवार व माजी आमदार संपतराव पवार - पाटील यांचे चिरंजीव क्रांतिसिंह पवार पाटील हे पराभूत झाले आहेत पवार -पाटील यांना 1655 मते मिळाली आहेत.आजऱ्यातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाने मी निवडून आलो. या निवडणुकीत जनशक्ती निधन शक्तीला पराभूत केले आहे. असे प्रतिपादन नवनिर्वाचित सदस्य सुधीर देसाई यांनी केले. आजरा तालुक्यातील सेवा संस्था गटातून सुधीर देसाई हे अठ्ठावन्न मते घेऊन निवडून आले. अशोक चराटी यांना 48 मते मिळाली. विजया नंतर माध्यमांशी संवाद साधताना देसाई म्हणाले, आज राज्यातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला. सतीश पाटील मुश्रीफ साहेब यांनी मला उमेदवारी देऊन संधी दिली. आज राज्याच्या जनतेने मला निवडून दिले. जनशक्तीने धनशक्ती ला हरवले.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.