KDCC Bank Election Esakal
आजरा (कोल्हापूर): कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेच्या (KDCC Bank Election) मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली. जिल्ह्यात १२ तालुक्यातील ४० केंद्रावर मतदान चुरशीने झाले. विविध ठिकाणाच्या केंद्रावरील गर्दीचे व चुरशीच्या क्षणाचे छायाचित्रण केले आहे सकाळचे छायाचित्रकार बी.डी.चेचर, श्रीकांत देसाई, वरिष्ठ बातमीदार सुनिल पाटील, रणजित कालेकर, शाम पाटील. (Kolhapur District Bank Election 2022)
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 8 पासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदानाला ठरवादार सभासदांनी मतदानास गर्दी केली.सकाळच्या सत्रात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तसेच शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी मतदानाचा हक्क बजावला. आज (ता. ५)सकाळपासूनच सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यानी पिवळ्या टोप्या घालून मतदान केंद्रावर हजेरी लावली आहे.पालकमंत्री सतेज पाटील यांनी गगनबावडा येथे मतदानाचा हक्क बजावला. "मोठ्या भावाला भेटून यायला लागतंय" अस म्हणत खासदार संजय मंडलिक यांनी मतदान केंद्राबाहेर सत्तारुढ गटाच्या बुथमध्ये बसलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यरते आवक झाले. आजरा येथील डॉ झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल या मतदान केंद्रावर सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सेवा संस्था गटात चुरशीने ९९ टक्के इतके मतदान झाले. या गटात विद्यमान संचालक अशोक चराटी यांच्या विरोधात सत्ताधारी छत्रपती शाहू आघाडीचे सुधीर देसाई अशी लढत झाली. दोन्ही गटांकडून ठराव धारक मतदारांना चारचाकी वाहनातून मतदान केंद्रावर आणण्यात आले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेच्या गारगोटी येथील मतदान केंद्रावर चुरशीने मतदान झाले. सत्तारूढ गटाच्या ठरावदार मतदारांनी पिवळे फेटे तर विरोधी गटाच्या ठरावदारांनी भगव्या टोप्या परिधान करून चुरशीने आणि खेळी-मेळीत मतदान केले. आजरा : हात उंचावून विजयाची खूण करताना उमेदवारांचे समर्थक मतदार.जिल्हा बँकेसाठी शाहूवाडीत सर्जेराव पाटील, पेरिडकर व रणवीर गायकवाड यांच्यात मोठ्या अटीतटीची काटा लढत झाली. मात्र शाहू हायस्कूल शाहूवाडीच्या मतदान केंद्रावर मानसिंग गायकवाड व सर्जेराव पाटील हे एकत्रित गप्पा मारताना पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. आजऱ्यात ठराव धारक मतदारांना मतदान केंद्रावर आणले. त्यांचे रांगेने मतदान झाले. यानंतर अर्ध्या तासाने देसाई गटाचे ठराव धारक मतदार मतदान केंद्रावर आले. त्यानेही रांगेने मतदान केले. यावेळी मतदान केंद्र परिसरात दोन्ही गटाच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. दोन्ही गटाच्या समर्थकांकडून दावे प्रतिदावे केले जात होते. दोघांनीही विजयाचा दावा केला.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.