Chhatrapati Shivaji Maharaj News ESakal
सदाशिवनगर बंगळूर (Sadashivnagar,Bengalur)येथे छत्रपती शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक गुरुवारी रात्री (ता. १६) घटना घडली. या घटनेमुळे कर्नाटकसह महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटले. कोल्हापुरात कर्नाटकी मालकांची हाॅटेल बंद करण्यात आली,तर मिरजेत कानडी फलकाची नासधुस करून कर्नाटकातून आलेल्या खासगी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. काही महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरण्याबरोबरच वेळोवेळी अवमानाचा प्रयत्न कर्नाटकात काही संघटना व समाजकंटकांकडून होत आहे. या घटनेचे छायाचित्र. (Chhatrapati Shivaji Maharaj Sadashivnagar Bengalur)
कोल्हापुरात सर्व पक्षाच्या वतीने शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. तसेच युवा काँग्रेस वतीने मिरज तिकटी येथे कर्नाटक सरकारचा ध्वज जाळण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बंगळूर येथे विटंबना करण्यात आल्यानंतर शहर आणि परिसरात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले.शिवाजी उद्यान येथे मोठ्या संख्येने जमा होत असलेल्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात दडपशाही करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कार्यकर्ते शिवाजी उद्यान परिसरात ठाण मांडून बसले.मिरजेत शहरातील शिवसेनेच्या शहर कार्यकारीणीमधील पदाधिका-यांनी कर्नाटकातून आलेल्या आणि हॉटेल मधुबनसमोर थांबलेल्या खाजगी गाड्यांवर दगडफेक करून त्यांची मोडतोड केली. यामध्ये गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाहनांची तोडफोड करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, भाषिक तेढ निर्माण करणे, कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणे, खुनाचा प्रयत्न करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे संभाजी चौकातील आंदोलन कार्यकर्त्यांवर दाखल केले. यावेळी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले. शिवाजी उद्यानात शिवप्रेमी व कार्यकर्त्यांना रोखताना पोलिस.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बंगळूर येथे विटंबना करण्यात आल्यानंतर शहर आणि परिसरात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले यावेळी शिवप्रमी आणि पोलिस.संकेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शनिवारी सकाळी अभिषेक घालण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेले शिवप्रेमी.महिला कार्यकर्त्यांकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. यावेळी पोलिसांचे कडे तोडून उद्यानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पाच जणांना आत जाऊन दुग्धाभिषेक करण्याची परवानगी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. तत्पूर्वी मंत्री जोल्ले यांनी अक्कोळ क्राॅसवरील संगोळी रायण्णा सर्कलमध्ये संगोळी रायण्णा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
शिवछत्रपती मूर्ती अवमानप्रकरणा काल रात्री अटक करण्यात आलेल्या शिवप्रेमी कार्यकर्त्यांना कोर्टमध्ये हजार करण्यासाठी श्री शुभम शेळके, अंकुश केसरकर यांच्यासह इतर जणांना घेऊन जाताना विकाऊ कर्नाटकी पोलीस व प्रशासन याचा जाहीर निषेध करण्यात आला.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.