अलीकडे लाल भेंडी खूप लोकप्रिय होत आहे. याचे कारण म्हणजे ती हिरव्या भेंडीपेक्षा अधिक पौष्टिक आणि फायदेशीर आहे. या भेंडीला 'कुमकुम भेंडी' असंही म्हणतात. हे उत्तर प्रदेशात पिकवले जाणारे एक असं पीक आहे, यातून शेतकऱ्यांचे उत्पन्नही दुप्पट होतंय.
आरोग्यासाठी फायदेशीर-
कृषी तज्ज्ञांच्या मते, 'कुमकुम भेंडी'मध्ये ९४ टक्के पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असते जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. यासोबतच त्यातील ६६ टक्के सोडियम घटक उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, तर त्यातील २१ टक्के लोहामुळे अशक्तपणाची समस्या कमी होते. ५ टक्के प्रथिने शरीरातील चयापचय प्रणाली व्यवस्थित ठेवतात. ''हापूरमधील अन्वरपूरचे रहिवासी उमेश सैनी आणि सीतापूरमधील रामपूरबेह येथील मुरली रेड लेडीफिंगरच्या लागवडीमुळे खूश आहेत. "गावातील प्रत्येकजण आता या हंगामात लागवडीखालील क्षेत्र वाढविण्याचा विचार करत आहे," असं सैनी म्हणाले.कुमकुम भेंडीची पौष्टिक मूल्ये-
कुमारगंज, अयोद्धा येथील आचार्य नरेंद्र देव कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू बिजेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, भेंडीच्या या लाल जातीमध्ये अँथोसायनिन्स आणि फिनोलिक असतात, ज्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य वाढते. यामध्ये असलेले क्रूड फायबर साखर नियंत्रित करते. यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स देखील मोठ्या प्रमाणात असते.पेरणीसाठी योग्य हंगाम-
कुमकुम भेंडीची पेरणी करण्याचा आदर्श काळ फेब्रुवारीपासून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत असतो. नोव्हेंबरच्या आसपासही पेरणी केली जाते. डिसेंबर-जानेवारीमध्ये वाढ होते, आणि फेब्रुवारीपासून भेंड्या येऊ लागतात, ज्या नोव्हेंबरपर्यंत मिळतात. या पिकाला भावही चांगला मिळतो.किंमत-
घाऊक बाजारात हिरव्या भेंडीची किंमत १२ ते १५ रुपये प्रतिकिलो आहे, तर लाल भेंडी ४५ ते ८० रुपये किलो दराने विकली जात आहे. लोक याकडे सुपरफूड म्हणून पाहत आहेत. (IANS च्या इनपुटसह)सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.