आतापर्यंत तुम्ही जगभरातील अनेक तलावांबद्दल ऐकले असेल, पण आज आम्ही तुम्हाला अशा तलावांबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या आत संपूर्ण जंगल वसलेले आहे. या तलावाचे नाव आहे, लेक कॅंडी आणि ते कझाकिस्तानमध्ये आहे.
कँडी लेक हे कझाकिस्तानमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि तिचे सौंदर्य लोकांना आश्चर्यचकित करते. जेव्हा तुम्ही तलावमध्ये पाहाल, तेव्हा त्यामध्ये एक संपूर्ण जंगल वसलेले दिसेल आणि तुम्हाला वाटेल की ते पाण्यात वाढणारी झाडे आहेत.तलावामध्ये लाकडी खांब आहेत, जे झाडांचे भाग आहेत. उर्वरित झाड पाण्याखाली बुडाले आहे. हे तलावाच्या आत झाडांच्या जंगलासारखे आहे.असे म्हटले जाते की, वर्ष 1911 मध्ये एक भयंकर भूकंप झाला, त्यानंतर संपूर्ण परिसर पाण्याने भरून गेला आणि झाडांनी भरलेले जंगल देखील पाण्यामध्ये बुडाले.हा तलाव समुद्रसपाटीपासून सुमारे 2,000 मीटर उंचीवर आहे आणि कझाकिस्तानमधील अल्माटी शहरापासून 280 किमी अंतरावर आहे.
या तलावाची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्याचे पाणी खूप थंड आहे आणि ते झाडांसाठी फ्रीजसारखे काम करते. हिवाळ्यात आईस डायव्हिंग आणि मासेमारीसाठी हे तलाव लोकांचे आवडते ठिकाण आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.