Mahabaleshwar Hill Station esakal
उन्हाळी हंगामामुळं महाबळेश्वर व पाचगणी ही पर्यटनस्थळं बहरली आहेत.
महाबळेश्वर (सातारा) : सलग सुट्यांमुळं इथं पर्यटकांची मोठी गर्दी झाली असून, नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागत आहे. पर्यटकांची सायंकाळी नौकाविहारासाठी वेण्णालेकसह विविध प्रेक्षणीय स्थळांवर गर्दी होत आहे. मुख्य बाजारपेठेतही पर्यटक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. परंतु, अपुऱ्या वाहनतळामुळं बाजारपेठ परिसरातही मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या कोंडीमुळं पर्यटकांना गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे.उन्हाळी हंगामामुळं महाबळेश्वर (Mahabaleshwar) व पाचगणी ही पर्यटनस्थळं बहरली आहेत. गेली काही दिवस महाबळेश्वर व परिसर धुक्यात हरवल्याचं चित्र दिसत होतं. या बदललेल्या वातावरणामुळं पर्यटकांना पावसाळ्यातील महाबळेश्वरची अनुभूती मिळत आहे. शनिवार, रविवार या सलग आलेल्या सुट्यांमुळं पर्यटकांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. ऑर्थरसीट पॉइंटसह पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले श्री क्षेत्र महाबळेश्वर, शूटिंगसाठी प्रसिद्ध असलेला केट्स पॉइंट, तसेच पश्चिम घाटाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी प्रसिद्ध लॉडविक व एलिफंट हेड सोबतच सायंकाळी मुंबई पॉइंट येथे पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. किल्ले प्रतापगड (Pratapgad), शिवकालीन खेडेगाव, मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून भेट देत आहेत. येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेकला, तर चौपाटीचे स्वरूप आले असून, वेण्णालेकची पाणीपातळी घटली असली, तरी नौकाविहाराचा मनमुराद आनंद पर्यटक लुटत आहेत. अनेक हौशी पर्यटक वेण्णालेकवर घोडे सवारीचा आनंद घेत आहेत. येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरीची (Strawberry) चव चाखताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत. येथील मुख्य बाजारपेठेत देखील पर्यटकांची खरेदीसाठी गर्दी होताना दिसत असून, चणा, चिक्की, जॅम, फज सोबतच चप्पलची खरेदी करताना पर्यटक दिसत आहेत. रेस्टॉरंटही सायंकाळी फुल्ल होत आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.