साड्यांमध्ये नेहमीच ट्रेंड बदलत असतो. कधी भरगज्ज भरलेल्या साड्या तर कधी अगदी साध्या साड्यांचा ट्रेंड पाहायला मिळतो. आजकाल जादा प्रमाणात सिल्कच्या साड्यांचा ट्रेंड आहे. यामध्ये प्लेनपासून प्रिंटेड वर्कची फॅशन आहे. पार्टीच्या कोणत्याही फंक्शनमध्ये या साड्या परिधान करून तुम्ही खास आणि आकर्षक दिसू शकता.
सिल्क साडीमध्ये खूप व्हरायटी पाहायला मिळतात. पण काही असे कलर असतात जे सर्वांनाच छान दिसतात. यामध्ये मजेंटा कलरची रंगाची साडी कोणत्याही सण-समारंभ, संध्याकाळचे गेट टुगेदर, इव्हेंट किंवा पार्टीत घालण्यासाठी उत्तम पर्याय आहे. हे सॅटिन फॅब्रिकमध्ये असल्याने तुमचा लुक छान दिसेल. या साड्यांमध्ये रेडीमेड कटींग ब्लाउज पीस असतो. ज्यावर फक्त तुम्हाला टीपा मारून घ्यायच्या असतात.
सिल्क साडीमध्ये बनारसी सिल्क पॅटर्नही तुम्ही खरेदी करू शकता. यात डार्क किंवा लाईट कलर मिळतात. जे लग्नसमारंभ, पार्टीला वापरू शकता. याशिवाय तुमच्या जवळच्या नातेवाईकांना भेटही देऊ शकता. सोनेरी रंगाच्या जरी बॉर्डरची साडी सुंदर दिसते.
वाईन कलरची सॅटिन सिल्क साडी वेगवेगळ्या बाॅर्डर लुकमध्ये तुम्हाला खरेदी करता येतील. किटी पार्टी किंवा कोणत्याही खास प्रसंगी ही साडी वापरू शकता. भरतकाम केलेला ब्लाउज साडीला हटके लूक देतो.
बनारसी सिल्क फॅब्रिकमध्ये एथनिक मोटीफ वर्क केलेल्या साड्याही खूप सुंदर दिसतात. यामध्ये पिंक कलरच्या साडीवर कॉन्ट्रास्ट पर्पल कलरची बॉर्डर असलेली साडी दिसायला खूप सुंदर दिसते.
एथनिक लुकसाठी तुम्ही कांजीवरम सॉफ्ट सिल्क साडीचा पर्यायही निवडू शकता. गडद हिरव्या रंगासोबत कॉन्ट्रास्ट गोल्डन कलरची जाड बॉर्डर साडीला आणखीनच सुंदर बनवते. याशिवाय साडीवर केलेले स्टायलिश जरीचे विणकामामुळे हा लुक वेगळाच दिसतो.या खास सुंदर कलरच्या साड्या एकदा ट्राय कराच.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.