नोटांवर या रेषा का बनवल्या आहेत, याचा कधी विचार केलाय? या तिरक्या रेषा नोटेबद्दल खूप महत्त्वाची माहिती देतात.
भारतीय रुपया (Indian Rupee) हे भारतीय गणराज्याचं अधिकृत चलन आहे. एक भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये विभागला जातो. भारतीय चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात. सर्व भारतीय चलनी नोटा (Indian Currency) या भारतीय रिझर्व बॅंकेतर्फे (Reserve Bank of India) बनविल्या जातात. भारतीय चलनासाठी युनिकोडमध्ये U+20B9 ही नियमावली ठरवण्यात आलीय.कधी ना कधी नोटांवरच्या तिरक्या रेषा तुमच्या लक्षात आल्या असतील. विशेष म्हणजे, नोटांच्या किमतीनुसार त्यांची संख्या बदलत असते. नोटांवर या रेषा का बनवल्या आहेत, याचा कधी विचार केलाय? या तिरक्या रेषा नोटेबद्दल खूप महत्त्वाची माहिती देतात. जाणून घ्या 100, 200, 500 आणि 2000 च्या नोटांवर बनवलेल्या या रेषांचा अर्थ काय आहे?नोटांवरील या रेषांना 'ब्लीड मार्क्स' असं म्हणतात. हे ब्लीड मार्क्स (Bleed Marcus) खास दृष्टिहीनांसाठी बनवले आहेत. नोटेवरील या रेषांना स्पर्श केल्यानंतर ती किती रुपयांची नोट आहे, हे ते ओळखू शकतात. 100, 200, 500 आणि 2000 च्या नोटांवर वेगवेगळ्या रेषा तयार करण्यात आल्या आहेत, यावरून त्याची किंमतही कळते.100 रुपयांच्या नोटेवर दोन्ही बाजूला चार रेषा, तर 200 च्या नोटेवर देखील दोन्ही बाजूंना चार रेषा आहेत. तसेच 500 च्या नोटेवर 5 आणि 2000 च्या नोटांच्या दोन्ही बाजूला 7-7 रेषा आहेत. या रेषांच्या साहाय्यानेच अंधांना त्याची किंमत कळते. 2000 रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूस मंगलयानचा फोटो छापण्यात आलाय. हा भारताच्या मंगळ मोहिमेचा एक भाग आहे. 500 च्या नोटेवर लाल किल्ल्याचं चित्र छापण्यात आलंय, तर 200 रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूस सांची स्तूप छापण्यात आलंय, जे मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात आहे.100 रुपयांच्या नोटेवर 'रानी की वाव'चं चित्र छापण्यात आलंय. ही एक पायरी विहीर आहे, जी गुजरातच्या पाटण जिल्ह्यात आहे. सोलंकी राजघराण्यातील राणी उदयमतीनं तिचे पती भीमदेव यांच्या स्मरणार्थ ती विहीर बांधण्यात आलीय. 2014 मध्ये युनेस्कोनं याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.