दोरीच्या उड्या मारणे ही अशी एक एक्सरसाइझ आहे. जी आपल्याला अति-थकवा न येऊ देता शरीराचे सर्व भाग क्रियाशील करते.
दररोज दोरीच्या उड्या मारल्याने हृदयाची क्षमता वाढते आणि या कार्यामुळे हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो.रोज दोरीच्या उड्या मारल्याने वजनासह शरीरातील फॅटचे प्रमाण कमी होते आणि लठ्ठपणा (ओबेसीटी) कमी होतो.रोज दोरीच्या उड्या मारल्याने आपले शरीर लवचिक बनते तसेच स्नायू मजबूत होते.स्टॅमिना वाढविण्यासाठी दररोज दोरीच्या उड्या मारणे फायदेशीर मानले जाते.
शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यासाठीही दोरीच्या उड्या मारणे चांगले आहे.
जे लोक रोज न चुकता दोरीच्या उड्या मारतात त्यांची उंची लवकर वाढण्यास मदत होते. रोज दोरीच्या उड्या मारल्यास, शरीरात हार्मोन्सचे संतुलन होते, ज्यामुळे तणाव आणि नैराश्यासारखी कोणतीही समस्या उद्भवत नाही.
तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्यास, दररोज दोरीच्या उड्या मारणे हे फार प्रभावी ठरू शकते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.