Udayanraje Bhosale Gunaratna Sadavarte esakal
सातारा न्यायालयानं सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना सातारा पोलिसांनी (Satara Police) ताब्यात घेतलं होतं.सातारा न्यायालयानं सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.ही मुदत संपत आल्यानं सदावर्ते यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं असता, त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आलंय.दीड वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या गुन्ह्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.न्यायालयानं अॅड. सदावर्तेना दि. 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा पोलिसांनी सदावर्तेंची पोलीस कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयानं ही मागणी फेटाळली.याबरोबर बाहेर येताच गुणरत्न सदावर्तेंनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवित घोषणाबाजी केली. (फोटो : प्रमोद इंगळे)सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.