'Lord Of The Rings' team met Mumbai dabbawala esakal
The Rings Of The Power: हॉलीवूडच्या काही चित्रपटांनी जगभर आपला प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. त्यामध्ये लॉर्ड ऑफ द रिंग्स या चित्रपटाचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. या चित्रपटानं भारतातल्या प्रेक्षकांनाही वेड लावलं आहे. (Hollywood Movies) सध्या लॉर्ड ऑफ द रिंग्स हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे." द लॉर्ड ऑफ दि रिंग्स" ची पुढील सिरीज " द रिंग्स ऑफ दी पॉवर " या प्राईम व्हिडीओ च्या 2 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
" द लॉर्ड ऑफ दि रिंग्स" ची पुढील सिरीज " द रिंग्स ऑफ दी पॉवर " या प्राईम व्हिडीओ च्या 2 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. रिलीज होत (Entertainment news) असलेल्या वेब सिरीज चा प्रमोशनचा आणि प्रिमीअर शो चे आयोजन " प्राईम व्हिडीओ " च्या माध्यमातून करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर वेब सीरिजच्या टीमने मुंबईतील डब्बेवाल्यांची भेट घेतली. मुंबईतील डबेवाल्यानी वर्षानुवर्षे विकसित केलेल्या व्यवस्थापन कौशल्याबाबत द लॉर्ड ऑफ दि रिंग्सच्या टीमला कुतूहल होते. जागतिक पातळीवर प्रदर्शित होत असलेल्या " रिंग्स ऑफ पॉवर " चा आशियातील उद्घाटन सोहळा या चित्रपटातील सर्व कलाकारांसह मुंबई डबेवाल्यां सोबत पार पडला. यावेळी कलाकारांनी डबेवाल्यांसोबत एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. मुंबईतील डबे वाल्यांच्या कामकाजाची ख्याती जगभर पसरली असून आपण मुंबईच्या ओळखीचे केंद्रबिंदू आहात असे मत अभिनेत्री नाझदिन बोनियादी यांनी व्यक्त केले. आपल्या कामातील नियोजन आणि मेहनत थक्क करणारी असून तुम्ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहात असे या चित्रपटाचे लेखक जे. डी . पेन यांनी डबे वाल्यांच्या कार्याबद्दल कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. लॉइड ओवेन यांनी डबेवाल्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत डबेवाल्यां चे कामकाज कसे चालते हे जाणून घेतले. 'द लॉर्ड ऑफ द रिंग्जच्या निर्मात्यांनी अलीकडेच मुंबईत एक शानदार प्रीमियर आयोजित केला होता. या कार्यक्रमाला रॉब अरमायो, मॅक्सिम बाल्ड्री, मार्केला कावेनाघ, चार्ल्स एडवर्ड्स, लॉयड ओवेन, मेगन रिचर्ड्स आणि इतरांसह मालिकेच्या संपूर्ण कलाकारांनी भाग घेतला. स्क्रिनिंगच्या अगोदर, अभिनेते रॉब अरमायो, मॅक्सिम बाल्ड्री, मेगन रिचर्ड्स, मार्केला कावेनाघ, एमा होर्वाथ, टायरोन मुहाफिदिन आणि सारा झ्वांगोबानी, रेड कार्पेटवर सोबत सामील झाले जिथे त्यांनी त्यांच्या मुंबई भेटीचे सर्वोत्तम क्षण शेअर केले.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.