Himanshu malhotra and amruta khanwalikar instagram
अमृता खानविलकरने मराठीबरोबरच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केलं आहे. जशी अभिनय क्षेत्रात अमृता चर्चेत राहिली, त्याचप्रमाणे तिची लव्ह स्टोरीसुद्धा चर्चेत राहिली. अमृताची लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभावी अशीच आहे.
अमृता आणि हिमांशूची ओळख 'इंडियाज सिनेस्टार की खोज' या कार्यक्रमाच्या सेटवर झाली आणि तिथूनच त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. जवळपास १० वर्षे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर २४ जानेवारी २०१५ रोजी त्यांनी लग्न केलं.अमृता ही मराठी आणि हिमांशू हा पंजाबी असल्यामुळे 'पंजाबी-मराठी' अशा दोन्ही पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला होता. 'नच बलिये 9'च्या सेटवर हिमांशूने एक किस्सा सांगितला होता.रिलेशनशिपमध्ये असताना अमृता आणि हिमांशू यांच्यातही रूसवे-फुगवे होते.पण एकदा इतक्या कडाक्याचं भांडण झालं की, अमृताने हिमांशूसोबतचे रिलेशनशिप तोडलं आणि ती दुसऱ्या मुलाला डेट करु लागली.मात्र अमृताने हिमांशूला विसरणं इतकं सोपं नव्हतं. मग ते रिलेशनशिप सोडून अमृता पुन्हा हिमांशूकडे आली.त्या भांडणानंतरच अमृता आणि हिमांशूने लग्नाचा निर्णय घेतला.यांच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.