Mahalaxmi Yatra celebrated in Pingali Khurd esakal
चोरांची कुणकुण लागताच गावकरी लाठ्या-काठ्या घेऊन त्यांना अडविण्यासाठी वेशीवर पोचले.
गोंदवले (सातारा) : भर दुपारच्या वेळी गावात चोरांचा प्रवेश होणार असल्याची कुणकुण लागताच गावकरी लाठ्या-काठ्या घेऊन त्यांना अडविण्यासाठी वेशीवर पोचले.त्यांनतर या सात चोरांबरोबर सुरू झालेलं घमासान युद्ध अखेर मंदिरासमोर येऊन थंडावताच देवीच्या नावाचा जयघोष करत सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. श्री महालक्ष्मी देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त (Mahalakshmi Yatra) ही पारंपरिक लढाई पिंगळी खुर्द (ता. माण) इथं आज पाहायला मिळाली.सातारा-पंढरपूर मार्गावरील (Satara-Pandharpur Route) पिंगळी खुर्द गावात (Pingali Khurd Village) ग्रामस्थांसह पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली. अकलूज, दातेवाडी, आंभेरी, नढवळ, जाखणगाव, सवली, पंदारे या मानाच्या पाहुण्यांचे गावकऱ्यांनी वाजत गाजत मिरवणुकीनं स्वागत केलं. निमित्त होतं येथील प्राचीनकालीन श्री महालक्ष्मी देवीच्या वार्षिक यात्रेचं. कोरोनानंतर यंदा ही यात्रा चांगलीच बहरलीय. रेड्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या यात्रेनिमित्त देवीच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरूय. आज शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं मानकऱ्यांसह माहेरवासिनींनी मोठी हजेरी लावलेली पाहायला मिळाली.या यात्रेचा एक भाग म्हणून चोरांचा खेळ ही अनोखी परंपरा भाविकांनी आज जोपासली. दुपारी बाराच्या सुमारास गावाबाहेरील शिवारात देवीची उपासना करून मानाच्या सात चोरांनी गावाकडं कूच केली. परंतु, या चोरांना गावात शिरून न देण्यासाठी गावकरीही लाठ्या-काठ्यांसह सरसावले. वेशीवरच चोर आणि ग्रामस्थ आमनेसामने ठाकले अन् खेळाला सुरुवात झाली. देवी भक्त असलेले सर्वचजण लुटुपुटूची लढाई करत मंदिरापर्यंत पोचले. देवीच्या नावाचा एकच जयघोष झाला आणि या अनोख्या पारंपरिक खेळाचा समारोप करण्यात आला.यावेळी सरपंच शांताबाई जाधव, उपसरपंच शांताबाई आवळे, यात्रा कमिटी अध्यक्ष दयानंद जाधव, माजी सरपंच लक्ष्मण जाधव, संजय जाधव, पोलीस पाटील महेशराजे शिंदे, सोसायटीचे संचालक ब्रह्मदेव जाधव, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.