CM Eknath Sambhaji Shinde esakal
कास (सातारा) : गेली पंधरा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) केंद्रस्थानी राहिलेले महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे (CM Eknath Sambhaji Shinde) यांचं गावाकडील साधं रूप अनेकांना माहीत नसेल, पण मंत्री असतानाही सातत्यानं गावाकडं संपर्क ठेवून आपली गावची शेतीवाडी करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलाय. महाबळेश्वर जावळी तालुक्यातील (Jawali Taluka) दरे तर्फ तांब (Dare Village) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मूळगाव. वयाच्या 18 व्या वर्षी ठाणे (Thane) इथं उदरनिर्वाहासाठी जाऊन सुरुवातीला रिक्षा चालवणारा हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण, आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर हे पद मिळवून त्यांनी कष्ट करायची तयारी असेल, तर सर्वसामान्य व्यक्तीही यशस्वी होऊ शकतो हे दाखवून दिलंय.गतसाली याच दिवसांत मुख्यमंत्री गावाकडं भात लावण्याच्या कामात व्यस्त दिसत होते. त्यानंतरही आपल्या घराशेजारील हळदीची शेती असेल किंवा परिसरातील झाडं असतील यामध्ये सातत्यानं रममान झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोयनाकाठचा अभिमान झाले आहेत.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे हे अनोखी रूप आपणास पहावयास नक्कीच आवडेल!सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.