Maharashtra Ekikaran Samiti esakal
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर कन्नड गुंडांनी भ्याड हल्ला केला आहे.
बेळगाव (कर्नाटक) : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे (Maharashtra Ekikaran Samiti) अध्यक्ष दीपक दळवी (Deepak Dalvi) यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हजारो मराठी भाषिकांचा मोर्चा टिळकवाडी पोलीस स्थानकावर निघाला आहे.भ्याड हल्ला करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा स्वस्थ बसणार नाही, असा इशारा समिती कार्यकर्त्यांमधून दिला जात आहे.मेळाव्याला मराठी भाषिक मोठ्या संख्येने जमलेले असताना पोलिसांच्या (Karnataka Police) संरक्षणात मूठभर कन्नड गुंडांनी अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले असून मराठी भाषिकांनी व्हॅक्सिन डेपोपासून मोर्चाला सुरुवात केली आहे.मोर्चाला सुरुवात होताच पोलिसांनी कार्यकर्त्यांची पुन्हा अडवणूक केलीय. मात्र, कोणत्याही परिस्थितीत पोलिसांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडून पोलिस स्थानकाकडे कूच केलीय.जोपर्यंत हल्ला करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत कार्यकर्ते पोलीस स्थानकात ठाण मांडून बसणार आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.