Maharashtra HSC 12th Exam 2022 News
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा (HSC Written Exam) आज शुक्रवारपासून (ता. ४) सुरू होत आहे. या परीक्षेसाठी १० हजार २७८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून तब्बल १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी (Students) नोंदणी केली आहे.
नाशिक : कोरोनानंतर पहिल्यांदाच आजपासून बारावीच्या ऑफलाईन परीक्षा पार पडल्या आहे. (छायाचित्रे केशव मते , नाशिक )नाशिक : गेल्या वर्षीच्या खंडानंतर यंदा ऑफलाइन पद्धतीने बारावीची परीक्षा होत आहे. (छायाचित्रे केशव मते ,नाशिक )नाशिक : काहीशी धाकधूक अन् सोबत आत्मविश्वास बाळगत परीक्षार्थी आपल्या परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते. उत्तर पत्रिका हाती पडतात विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आढळून आला. (छायाचित्रे केशव मते ,नाशिक )नाशिकमधील महाविद्यालयात टिपलेली ही दृश्ये (छायाचित्रे केशव मते ,नाशिक )ब्बल १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी (Students) नोंदणी केली आहे. परीक्षा केंद्रावर (Examination Center) विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान मोजले (थर्मल स्कॅनिंग) (Thermal Scanning) जाणार असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पेपरच्या नियोजित वेळेपूर्वी किमान एक ते दीड तास अगोदर हजर राहावे लागणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान मोजले (थर्मल स्कॅनिंग) जाईल. त्यानंतर परीक्षा सुरू होण्यापूर्वी ३० मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षागृहात प्रवेश मिळेल.. तर परीक्षेच्या १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येतील, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. राज्यात बारावीची परीक्षा दोन हजार ९९६ मुख्य केंद्र, तर सहा हजार ६३९ उपकेंद्र मिळून नऊ हजार ६३५ ठिकाणी होणार आहे. यंदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता ३ मार्च रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज विलंब शुल्कासह स्वीकारण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवला आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.