Maharashtra Political Crisis Eknath Shinde esakal
शिंदेंच्या खळबळजनक निर्णयामुळं राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालंय.
कास : सातारा जिल्ह्यामधील (Satara District) कोयना विभागातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्या राजकारणात जो काही भूकंप घडवून आणला आणि त्यानंतर त्यांच्या बंडामुळं शिवसेनेत राज्यभर उभी फूट पडलीय.महाराष्ट्रातून काही ठिकाणाहून शिवसैनिकांच्या तीव्र प्रतिक्रिया समोर येत असून या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या मूळ गावीसुद्धा सुरक्षा तैनात करण्यात आलीय.राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद आता त्यांच्या मूळ गावीही उमटू लागले आहेत.साताऱ्यातील दरे तर्फ तांब Dare Tamb Village (ता. महाबळेश्वर) येथील शिंदे यांच्या घरावर सुरक्षेच्या कारणास्तव कडेकोट पोलीस बंदोबस्त (Satara Police) तैनात करण्यात आला आहे.प्रथमच एवढा कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला पाहून ग्रामस्थ अवाक् झाले आहेत.गावातील ग्रामस्थ आता साहेबांच्या पुढील भूमिकेकडे डोळे लावून बसले आहेत. शिंदे साहेबांच्या खळबळजनक निर्णयामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. राज्यातील राजकीय घडामोडींनाही आता चांगलाच वेग आला आहे. (फोटो : सूर्यकांत पवार, प्रमोद इंगळे)सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.