non veg Parcels of food are not readily available
कोंबडी वडे/मालवणी वडे : श्रावण सुरू होण्याच्या आधी आषाढी अमावस्या असते. हल्ली हा दिवशी अनेक ठिकाणी गटारी साजरी केली जाते. कोकणामध्ये या दिवशी कोंबडी वडे बनवले जातात.चिकनच्या रस्स्यासोबत हे कोंबडी वडे चविष्ट लागतात.
कोळंबी भात: महाराष्ट्राच्या कोकण भागात बनवली जाणारा कोंळबी भात एकदा नक्की ट्राय करा. कोळंबी भाताला प्रॉन्स पुलाव असेही म्हणतात. कोंळबी भात बनिवण्याच्या वेगवेगळे प्रकार आहेत पण कोकणातील पद्धतीनुसार, भात आणि नारळाच्या दुध वापरुन कोळंबी भात बनविला जातो. मसल्यांचा सुगंध आणि गरमा गरमा कोळंबी भात पाहून तुमच्या तोंडालापाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. मालवणी कोळंबी कढी: रत्नागिरी, मालवण भागात नारळाचे दूध वापरुन ही रेसीपी बनवली जाते. त्यामध्ये कोकणातील वैशिष्ट्येपुर्ण मालवणी मसाले वापरले जातात. सी-फूड लव्हरसाठी उत्तम मेजवानी आहे.चिकन खर्डा : खर्डा ही मसालेदार हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे वापरुन चटणी बनवण्याची एक सामान्य महाराष्ट्रीयन पध्दत आहे आहे. तुम्हाला तिखट आणि झणझणीत जेवण आवडत असे असेल तर खर्डा चिकन तुमच्यासाठी आहे! ताज्या हिरव्या मिरच्यांमध्ये चिकनचे तुकडे चवीला ‘खर्ड्यासारखे लागतात.अंडा बिर्याणी : नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी झटपट तयार होणारी आणि तितकीच चवदार अशी अंडा रेसीपी म्हणजे अंडा बिर्याणी. शिजवलेले अंड मसल्यामध्ये शॅलो फ्राय करुन बिर्याणी बनवली जाते. या बिर्याणीला कोळश्याचा स्मोक दिल्या आणखी चव येते.चिकन सागोती :
चिकन सागोती ही मसालेदार मालवण शैलीची वैशिष्ट्यपूर्ण रेसीपी आहे. ही ताजे मसाले, खसखस, खिसलेले नारळ आणि मोठ्या लाल मिरच्यांमध्ये शिजवले जाते.वजडी मटण: मटण प्रेमींसाठी सर्वात अनोखी आणि चवदार मटण डिश म्हणजे वजडी मटण. 'वजडी' चा शाब्दिक अर्थ आहे शेळीचे आतडे! मसालेदार करीमध्ये शिजवल्यामुळे वजडी मटणाची चव वाढते. बांगडा फिश करी : बांगडा फिश करी हे कोकणी माणसाचं आवडतं खाद्य. बांगडा फिश करी हा पदार्थ आज नॉनव्हेज हॉटेलमधील आवडीचा पदार्थ आहे. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी बांगडा फिश करी हा उत्तम पर्याय आहे. ‘सावजी मटण : नागपूर व्यंजनामधली फेमस डीश म्हणजे ‘सावजी मटण’... भारतात ‘सावजी’ म्हणजे नागपूर अशीच ओळख निर्माण झाली आहे... झणझणीत ‘सावजी’चा जन्म नागपुरातच झाला आहे. विशेष म्हणजे हा मसाला पाटा, वरवंट्याच्या साहाय्यानेच वाटला जातो. असे हे चवदार मटण नॉनव्हेज खाणाऱ्यांचे अत्यंत प्रिय. वऱ्हाडी चिकन :
महाराष्ट्राच्या विदर्भात बनवले जाणारे वऱ्हाडी चिकन हे तिखट आणि मसालेदार असते. पारंपरिक पद्धतीनुसार, हे चिकन बनविनताना मातीची भांडी वापरली जातात त्यामुळे त्यांचा अर्क चिकनमध्ये उतरतो आणि आणखी चव वाढते. भाकरी सोबत वऱ्हाडी चिकन खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.