Jyotirling in India Sakal
Jyotirlinga in India: १ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. महाशिवरात्री दिवशी अनेक लोक भक्तीभावाने भगवान शंकराच्या मंदिरात जातात आणि मनोभावे पुजा करतात. तसं पाहिलं तर भारतात भगवान शंकराची अनेक मंदिरं आहेत, परंतु भारतातील ज्योतिर्लिंगांनं लोक विशेष महत्त्व आहेत. देशभरात एकूण 12 ज्योतिर्लिंगे आहेत. या ज्योतिर्लिंगांची थोडक्यात माहिती घेऊया.
सोमनाथ ज्योतिर्लिंग, गुजरात- देशातील पहिले ज्योतिर्लिंग गुजरातमधील सौराष्ट्रात आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या ज्योतिर्लिंगाचे नाव सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे. पुराणानुसार, प्रजापती दक्षाने चंद्राला क्षयरोगाचा शाप दिला होता. तेव्हा याच ठिकाणी चंद्राने शिवाची आराधना केली, शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी तपश्चर्या केली. या ठिकाणी स्वतः चंद्रदेवांनी ज्योतिर्लिंगाची स्थापना केल्याचे म्हटले जाते.
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, आंध्र प्रदेश-आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठी श्रीशैलम पर्वतावर वसलेले आहे. आंध्र प्रदेशात असलेल्या या ज्योतिर्लिंगाचे नाव मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे.
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश- मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाजवळ क्षिप्रा नदी वाहते. हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. येथे दररोज भस्म आरती केली जाते, ही आरती जगभरात प्रसिद्ध आहे.
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश- मध्य प्रदेशात एकूण दोन ज्योतिर्लिंगे आहेत. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाव्यतिरिक्त ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे माळवा प्रदेशात नर्मदा नदीच्या काठावर एका डोंगरावर वसलेले आहे. भाविकांनी इतर तीर्थक्षेत्रातून पाणी आणून ओंकारेश्वर बाबांना अर्पण केल्यास सर्व तीर्थे पूर्ण होतात, असा समज आहे.
केदारनाथ ज्योतिर्लिंग, उत्तराखंड- केदारनाथ धाम हे उत्तराखंडमधील चार धामांपैकी एक आहे, येथेच केदारनाथ ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंग अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांच्या काठी केदार शिखरावर वसलेले आहे. हे भगवान शंकराचे घर मानले जाते.भीमाशंकर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र - महाराष्ट्रात तीन ज्योतिर्लिंगे आहेत, पहिले पुण्यापासून १०० किमी अंतरावर डाकिनी येथे आहे. त्याला भीमाशंकर ज्योतिर्लिंग म्हणतात. या शिवलिंगाचा आकार बराच मोठा आहे, म्हणून त्याला मोटेश्वर महादेव असेही म्हणतात.
विश्वनाथ ज्योतिर्लिंग, उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेशातील पवित्र वाराणसीमध्ये विश्वनाथ ज्योतिर्लिंग विराजमान आहे. भगवान भोले नाथांचे लाडके मानले जाणारे हे ठिकाण काशी, धर्माची नगरी म्हणूनही ओळखले जाते. गंगा नदीच्या काठावर बाबा विश्वनाथाचे मंदिर आहे. असे म्हणतात की भगवान शिवांनी कैलास सोडले आणि काशीला कायमचे निवासस्थान केले.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र- महाराष्ट्रात आणखी एक ज्योतिर्लिंग आहे, ज्याला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणतात. हे नाशिकच्या पश्चिमेस ३० किमी अंतरावर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. काळ्या दगडांनी बनवलेल्या या मंदिराबाबत असे मानले जाते की गौतम ऋषी आणि गोदावरीच्या प्रार्थनेवरून भगवान शिव या ठिकाणी वास्तव्य केले होते.
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, झारखंड- बैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवघर, झारखंड येथे आहे. या मंदिराला बैद्यनाथधाम म्हणतात. त्याला रावणेश्वर धाम असेही म्हणतात.
नागेश्वर ज्योतिर्लिंग, गुजरात- सोमनाथ व्यतिरिक्त नागेश्वर ज्योतिर्लिंग देखील गुजरातमध्ये आहे. बडोदा जिल्ह्यातील गोमती द्वारकेजवळ असलेल्या या मंदिराविषयी असे सांगितले जाते की भगवान शंकराच्या इच्छेमुळे या ज्योतिर्लिंगाचे नाव नागेश्वर असे पडले.
रामेश्वरम ज्योतिर्लिंग, तामिळनाडू- 11 वे ज्योतिर्लिंग तामिळनाडूमधील रामनाथम नावाच्या ठिकाणी आहे. तामिळनाडूमध्ये रामेश्वरम ज्योतिर्लिंग आहे. असे मानले जाते की लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी भगवान रामाने शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यामुळे याला रामेश्वर असे नाव पडले.घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र- महाराष्ट्रातील तिसरे ज्योतिर्लिंग आणि भगवान शिवाचे १२ वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे जे संभाजीनगर जवळ दौलताबाद येथे आहे. या ज्योतिर्लिंगाला घुष्णेश्वर असेही म्हणतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.