Prabhu Vaidyanath, Bara Jyotirling esakal
परळी वैजनाथ (जि.बीड) : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री पर्वानिमित्त मोठी गर्दी झाली आहे. राज्य, परराज्यासह ग्रामीण भागातील भाविकांनी तब्बल दोन वर्षानंतर महाशिवरात्रीला दर्शनाचा लाभ घेतला. येथील वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह राज्य, परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले आहेत.
प्रभू वैद्यनाथगेल्या दोन वर्षापासून कोरोना विषाणूच्या प्रादूभावामुळे मंदिरे बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मंदिरे दर्शनासाठी खुले करण्यात आल्याने तब्बल दोन वर्षानंतर महाशिवरात्री पर्वाच्या निमित्ताने यंदा दर्शनासाठी मंदिर खुले असल्याने शिवभक्तांनी येथील प्रभू वैद्यनाथानाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान यात्रा होणार का ? नाही होणार ? ग्रामीण भागातील लालपरी बंद असल्याने गर्दीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.तसेच महाशिवरात्री पर्वाच्या निमित्ताने भाविक भक्तांसाठी विविध सामाजिक संस्थेच्या वतीने खिचडी प्रसाद, शुध्द पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात येत आहे.भाविक भक्तांच्या गर्दीच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त, सीसीटीव्ही कँमेरे लक्ष ठेवून आहेत. तर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविक भक्तांच्या दर्शनासाठी महिला, पुरुष, पासधारकांसाठी स्वतः व्यवस्था करण्यात आली आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.