Mahendrasingh Dhoni's Horse Sakal
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे चाहते जगभर आहेत. त्याचं भारतीय क्रिकेटमधील योगदान अतुलणीय आहे. धोनी जितका त्याच्या खेळासाठी ओळखला जातो, तितकाच त्याचं वैयक्तिक जीवनही चर्चेत असते. धोनीला पाळीव प्राण्यांचीही आवड आहे. त्याच्याकडे एका खास जातीचा घोडा आहे. (Mahendra Singh Dhoni's Horse-Shetland Ponies Scotland's Horse)
धोनीचं अलिशान फार्महाऊस काही एकरांमध्ये पसरलं आहे. धोनीचं हे फार्महाऊस एखाद्या महालापेक्षा कमी नाही. धोनीला पाळीव प्राण्यांची खूप आवड आहे. त्याच्या फार्महाऊसमध्ये श्वानांव्यतिरिक्त खूप पक्षीही आहेत. धोनीकडे लाखो रुपये किंमतीचा एक घोडाही आहे. परंतु हा घोडा इतर घोड्यांसारखा नाही.
धोनीकडे स्कॉटलँडमधील शेटलँड पोनी जातीचा घोडा आहे. या घोड्याचं वैशिष्ट्य म्हणजे या घोड्याची उंची जास्त नसते.
या घोड्याची जास्तीक जास्त उंची तीन फूटांपर्यंत असते. हा घोडा पळण्याच्या बाबतीतही इतर घोड्यांच्या खूप पाठीमागे राहतो.
या जातीचा घोडा फक्त शोसाठी ओळखला जातो. लोक त्याला फक्त हौस म्हणून खरेदी करतात.
धोनीकडे असलेल्या घोड्याचा रंग पांढरा आहे.
धोनीकडे यापूर्वी काळ्या रंगाचा घोडा होता. हा घोडा मारवाडी प्रकारचा होता. या घोड्याचं नाव चेतक असं होते.
धोनी आपल्या 46 एकर पसरलेल्या फार्म हाऊसमध्ये सेंद्रिय शेती तसेच गोपलनही करतो. त्याच्याकडे 100 पेक्षा जास्त गायी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.