Earthquake India Nepal News esakal
मध्यरात्री भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी संपूर्ण उत्तर भारत (North India) हादरला आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
Earthquake India Nepal News : मध्यरात्री भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी संपूर्ण उत्तर भारत (North India) हादरला आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रात्रीचा भूकंप इतका जोरदार होता की, झोपलेले लोक घाबरून उठून घराबाहेर पळाले. यानंतर बुधवारी सकाळी उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले.भूकंपविज्ञान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी उत्तराखंडमधील पिथौरागढमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा हादरा जाणवला. त्याचवेळी नेपाळमध्ये भूकंपामुळं उध्वस्त झाल्याचं दृश्य होतं. उत्तर भारतात रात्रीचा धक्का इतका जोरदार होता की, लोक घराबाहेर पडले. अनेकजण रात्रभर बाहेरच राहिले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी नोंदवण्यात आली.त्याचवेळी नेपाळमधील अछम इथं जमिनी खचल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत नेपाळमधूनच सर्वाधिक विनाशाच्या बातम्या समोर येत आहेत. डोटी इथं घर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. नेपाळच्या हिमालयीन भागात गेल्या काही दिवसांपासून कमी तीव्रतेचे भूकंप येत आहेत. 8 नोव्हेंबरला इथं दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले.भारत, चीन आणि नेपाळ या तीन देशांमध्ये हे भूकंप जाणवले. मंगळवारी दुपारी 1.57 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता 6.3 इतकी होती. लखनौ आणि दिल्लीत 5.7 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले. दिल्ली-उत्तर प्रदेश व्यतिरिक्त उत्तराखंड, बिहार, झारखंड आणि उत्तर-पूर्व भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळं लोक घराबाहेर पडले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं सांगितलं की, काल रात्री 1.57 च्या सुमारास हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील मणिपूर इथं होता.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.