सेलिब्रिटींचा पोशाख, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी या चाहत्यांसाठी फॅशन किंवा ट्रेंड बनण्यात फार वेळ लागत नाही. सेलिब्रिटींचे कपडे, डाएट, व्यायामाच्या सवयींनंतर आता 'ब्लॅक वॉटर'विषयी Black Water चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे.
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटरसुद्धा 'ब्लॅक अल्कलाइन वॉटर' पिताना दिसतात. शाहरुख खानची पत्नी गौरी खानचा ब्लॅक वॉटर बॉटलसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला. त्यानंतर पुन्हा एकदा याची चर्चा सुरू झाली.
साध्या पाण्याच्या ऐवजी हे सेलिब्रिटी ब्लॅक वॉटर का पित आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ब्लॅक वॉटरविषयीची माहिती आणि त्याची किंमतसुद्धा इंटरनेटद्वारे सर्च केली जात आहे.
गौरी खानशिवाय याआधी मलायका अरोरा, उर्वशी रौतेला, श्रुती हासन, अविका गौर, पौलमी दास यांच्याही हातात ब्लॅक वॉटर बॉटल पाहिलं गेलं. फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नव्हे तर क्रिकेटर विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासुद्धा ब्लॅक वॉटर पित असल्याची माहिती समोर येत आहे.
ब्लॅक वॉटरमध्ये अल्ट्रा हायड्रेटिंग आणि अँटी एजिंग गुणधर्म असल्याने अनेक सेलिब्रिटी त्याला प्राधान्य देताना दिसतात.
तज्ज्ञांच्या मते, ब्लॅक वॉटर शरीरातील अॅसिड नियंत्रित किंवा कमी करण्यास मदत करते. त्याचसोबत रोगप्रतिकारशक्ती आणि चयापचय वाढवण्यास मदत करते.
सामान्य RO पाण्यात 7 pH आणि शून्य खनिजं असतात, तर ब्लॅक वॉटरमध्ये ८+pH (अल्कलाइन) आणि ७० पेक्षा जास्त नैसर्गिक खनिजे असल्याचं म्हटलं जातं. यामुळे शरीरातील अॅसिडचं प्रमाण कमी करून ते हायड्रेटेड आणि डिटॉक्स केले जाते. त्याचप्रमाणे शरीराचं कार्य सुधारत असल्याचंही म्हटलं जातं.
ब्लॅक वॉटरचे शरीराला अनेक फायदे असल्याने सेलिब्रिटी त्याचा वापर अधिकाधिक करताना दिसतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.