Malvika Bansod Malvika Bansod
नागपूर : नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी बऱ्याच घडामोडी घडल्या. सकाळी सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वीच सात भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले आणि त्यापाठोपाठ महिला एकेरीत युवा मालविका बन्सोडने लंडन ऑलिंपिक ब्राँझपदक विजेत्या साईना नेहवालचा (Saina Nehwal) सरळ दोन गेममध्ये पराभव केला आणि मालविकाचा (Malvika Bansod) हा विजयच प्रमुख ‘हेडलाईन’ ठरली. (सर्व छायाचित्रे - BAI)
साईनाला आदर्श मानणाऱ्या व जागतिक क्रमवारीत १११ व्या स्थानावर असलेल्या डावखुऱ्या मालविकाने हा सामना अवघ्या ३४ मिनिटांत २१-१७, २१-९ असा जिंकला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.साईनाला मी आदर्श मानते. तिचा खेळ पाहून मी बॅडमिंटनमध्ये लहानाची मोठी झाली. आज तिच्याविरुद्ध प्रथमच खेळताना विजय मिळविला, तो सुद्धा इंडियन ओपन सुपर सिरीज स्पर्धेत ही माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे.गुडघ्याच्या दुखापतीमुळे पूर्णपणे तंदुरुस्त नसलेल्या साईनाविरुद्ध खेळताना मालविकाने पहिल्या गेममध्ये ४-१ अशी आघाडी घेत धमाकेदार सुरुवात केली.
अनुभव पणाला लावत साईनाने ४-४ अशी बरोबरी साधली. त्यानंतर दोघींनी प्रत्येक गुण मिळविण्यासाठी संघर्ष केला.अखेर सलग चार गुण मिळवून मालविकाने पहिला गेम २१-१७ असा जिंकला व १-० अशी आघाडी घेतली.साईना खूप महान खेळाडू असली तरी तिच्याविरुद्ध खेळताना कोणताही दबाव नव्हता.शरीर साथ देत असले तरी गुडघ्याच्या दुखापतीमुळे मी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हते. मालविका (Malvika Bansod) चांगली खेळाडू असून ती रॅली उत्तम खेळते. तिने आज खरच चांगला खेळ केला आणि ती आणखी प्रगती करेल, अशी आशा करते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.