Shweta Kharat Instagram/ Shweta Kharat
झी मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका 'मन झालं बाजींद'मधील नायिका कृष्णा म्हणजेच अभिनेत्री श्वेता खरात ही तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
साधेपणातच सौंदर्य आहे हे कृष्णाकडे पाहून कळतं. पण कृष्णाची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता खरात ही खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे.श्वेताचा स्टायलिश अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडतो.आपल्या स्टाईलबद्दल बोलताना श्वेता म्हणाली, "मला स्वतःला कम्फर्टेबल कपडे परिधान करायला आवडतात मग ते ट्रेडिशनल असोत किंवा वेस्टर्न."
"मला असं वाटतं की आपण सगळे कलर्स ट्राय केले पाहिजेत, मला स्वतःला पेस्टल कलर्स खूप आवडतात," असं तिने सांगितलं.
श्वेताला पेस्टल कलर्स आवडत असले तरी ती सर्व रंगसंगतीचे कपडे परिधान करते आणि प्रत्येक स्टाइल तिच्यावर शोभून दिसते.
कायली जेनर, जेनिफर लोपेझ, रिहाना यांना फॅशन आयकॉन म्हणून पाहत असल्याचं श्वेताने सांगितलं.
तर बॉलिवूडमध्ये दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि ब्लॉगर कोमल पांडे यांना फॉलो करत असल्याचं श्वेताने स्पष्ट केलं. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.