National Parks in Maharashtra Esakal
महाराष्ट्रातील सहा राष्ट्रीय अभयारण्ये (National Parks in Maharashtra)-
जगात सर्वात सुंदर कोण असेल तर तो निसर्ग. निसर्गासारखं सुंदर काहीच नाही. म्हणूनच निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे निश्चितच आनंददायी असते. अलीकडच्या काळात वाढत्या आधुनिकीकरणाच्या तडाख्यात जंगलांचा ऱ्हास झाला. भारतही त्याला अपवाद नाही. जंगले, त्यातील वनस्पतींच्या विविध प्रजाती, जंगलांमध्ये अधिवास करणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती टिकाव्या म्हणून विविध प्रकारच्या उपाययोजना सरकारने केल्या आहेत. राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प, तसेच विविध प्रकारची अभायारण्य हे त्याचाच भाग आहे.
वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 (Wildlife Conservation Act) च्या कलम 35, कलम 38 तसेच कलम 66 (3) नुसार घोषित केलेले संरक्षित क्षेत्र म्हणजे राष्ट्रीय उद्याने (National Park) होय. भारतामध्ये सध्या 104 राष्ट्रीय उद्याने असून त्यापैकी 6 राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रात (Maharashtra) आहेत. ही उद्याने कोणती आहे. हे आपण पाहणार आहोत.
1. ताडोबा –अंधारी (Tadoba Andhari) : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान असून त्याची घोषणा 1955 साली झाली होती. 115.14 चौ.किमी क्षेत्रावर वसलेल्या या राष्ट्रीय उद्यानात पशू पक्ष्यांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती पहावयास मिळतात. 2. पेंच (पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान) (Pench)- नागपूरमधील पेंच अर्थात पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान हे अतिशय प्रसिद्ध असे राष्ट्रीय उद्यान असून ते 257.98 चौ.किमी क्षेत्रावर पसरलं आहे. 1975 मध्ये हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. 3.नवेगाव बांध (Navegav Bandh)- गोंदिया जिल्ह्यात असलेलं नवेगाव बांध हे 133.88 चौ.किमी क्षेत्राचं राष्ट्रीय उद्यान आहे. याची घोषणासुद्धा 1975मध्येच करण्यात आले. 4. संजय गाधी राष्ट्रीय उद्यान (Sanjay Gandhi National Park)- मुंबई उपनगर (बोरीवली आणि ठाणे) या भागातील 103.09 चौ.किमी क्षेत्रावर वसलेल्या या राष्ट्रीय उद्यानाची घोषणा 1983 मध्ये झाली. मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी जिथं लोकांना श्वास घेणंही कठीण होऊन बसतं अशा ठिकाणी अशा प्रकारचे राष्ट्रीय उद्यान आहे, यावर भेट देणाऱ्यांचा विश्वास बसत नाही. 5.गुगामल (Gugamal)- मेळघाट, अमरावती येथील गुगामल राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं उद्यान असून ते 361.28 चौ.किमी क्षेत्रावर पसरलेलं आहे. त्याची घोषणा 1987 साली झाली. 6. चांदोली (Chandoli) - शिराळा (जि.सांगली) येथील चांदोली हे 317.67 चौ.किमी क्षेत्रावर असलेल्या या राष्ट्रीय उद्यानाची घोषणा 2004 मध्ये झाली होती. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.