आपल्यापेक्षा त्याचं वय जास्त किंवा ती आपल्यापेक्षा वयानं जास्त म्हणून लग्नाला येणाऱ्या अडचणी आता नवीन नाही. आपल्याला बॉलीवूडमध्ये मोठमोठ्या सेलिब्रेटींच्या वाट्याला अशाप्रकारच्या अडचणी आल्याचे दिसून आले आहे. मात्र मराठी मनोरंजन विश्वामध्ये देखील अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्यात वयातील अंतर जास्त असल्यानं त्यांना लग्नासाठी संघर्ष करावा लागल्याचे दिसुन आले आहे.
आता आपण मराठीतील अशाच प्रख्यात अभिनेता अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत. त्यांचे नाव आहे उमेश कामत (Umesh Kamat) आणि प्रिया बापट (priya bapat) यांच्याविषयी. आज उमेशचा वाढदिवस आहे. आपल्या वेगळ्या अभिनय शैलीमुळे उमेशच्या वाट्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आली. तो सध्याच्या घड़ीला मराठीतील आघाडीचा अभिनेता आहे. केवळ चित्रपटच नाही तर नाटकांमधूनही त्यानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 12 डिसेंबर 1978 साली उमेशचा जन्म झाला. मुंबईत जन्म झालेल्या उमेशच्या अभिनयाचे हजारो चाहते आहेत. तो सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असणारा सेलिब्रेटी आहेत. त्याचा प्रवास हा मालिकेतून सुरु झाला. त्यानंतर तो चित्रपट क्षेत्रामध्ये आला.
उमेशच्या मालिकांविषयी सांगायचे झाल्यास त्यानं ‘असंभव’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘शुभंकरोती’ या मालिकेतून त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. तिथपासून त्याला लोकप्रियता आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळण्यास सुरुवात झाली. उमेशनं अभिनेत्री प्रिया बापटसोबत लग्न केलं आहे.
उमेशचे चाहते आणि प्रेक्षकांना कदाचित एक गोष्ट माहिती नसेल ती म्हणजे, उमेश आणि प्रिया यांच्या वयात तब्बल 8 वर्षाचे अंतर आहे. काही काळ गेल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. उमेशनं लग्नाचा निर्णय घेण्यासाठी खूप वेळ घेतल्याचं प्रियानं सांगितलं होतं. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.