रशिया - युक्रेन संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता sakal
गेल्या ४८ तासात रशियाने सीमेवरील हालचाली वाढवल्या आहेत.
रशिया युक्रेनवर हल्ला करण्याची तयारी करत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यातच आता युक्रेनच्या सीमेवर रशियाने त्यांचे लष्कर तैनात केल्याचे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. गेल्या ४८ तासात रशियाने सीमेवरील हालचाली वाढवल्या आहेत. रशिया युक्रेनवर हल्ला करण्याची तयारी करत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यातच आता युक्रेनच्या सीमेवर रशियाने त्यांचे लष्कर तैनात केल्याचे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. गेल्या ४८ तासात रशियाने सीमेवरील हालचाली वाढवल्या आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये लढाऊ विमाने आणि फायटर-बॉम्ब जेटसुद्धा तैनात करण्यात आल्याचं दिसतं. अनेक ठिकाणी अड्डे तयार करण्यात आले असल्याचंही सांगण्यात येत आहे. युक्रेनच्या उत्तर आणि पुर्वोत्तर भागात रशियाने त्यांच्या लष्करी हालचाली वाढवल्या आहेत. यामध्ये क्रिमियात एक मोठं असं एअरबेसचा समावेश आहे. रशियाने या एअरबेसवर 2014 मध्ये ताबा मिळवला होता. युक्रेन मुद्दा सोडवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी फोनवरून संवाद साधला होता. त्यात त्यांनी बायडेन यांनी रशियाला त्यांचे सैन्य मागे घेण्यास सांगितलं होतं. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास युद्धाचा भडका उडेल आणि यात अनेक देश सहभागी होतील असं सांगितलं होतं. आता रशियाने त्यांचे युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेलं सैन्य मागे येत असल्याचं म्हटलं आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.