Narendra Modi and Kamala Harris esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी आज अमेरिकेच्या उपराष्ट्राध्य कमला हॅरिस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत पंतप्रधान मोदींनी अमेरिकेकडून कोरोनाच्या संकटात मिळालेल्या सहकार्याबद्दल, त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले. व्हाइट हाऊसमध्ये त्यांची भेट झाली. त्यानंतर प्रतिनिधींसोबत बैठकही झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी गुरुवारी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅऱिस यांच भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींसोबत बैठकसुद्धा झाली.बैठकीनंतर बोलताना कमला हॅरिस यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींचे वॉशिंग्टन डीसीमध्ये स्वागत करणे माझ्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे.भारत हा लसीकरणासाठी इतर देशांना महत्त्वाचा स्रोत ठरला आहे. लवकरच भारत पुन्हा लशींची निर्यात सुरु करणार आहे त्याबद्दल भारताचे स्वागतही कमला हॅरिस यांनी केले.पतंप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांचे कौतुक केले. भारत आणि अमेरिकेचे सहकार्य हळू हळू वाढत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक यावेळी एक ऐतिहासिक घटना ठरली. जगातील सर्वात मोठी आणि जगातील सर्वात जुनी लोकशाही म्हणून भारत आणि अमेरिका हे एकमेकांचे सहकारी आहेत. आपल्या मूल्यांमध्ये समानता आहे. आपला एकमेकांशी असलेला समन्वय आणि सहकार्य वाढत आहे असे मोदी यावेळी म्हणाले.तुमचा विजयाचा प्रवास हा ऐतिहासिक आहे आणि भारतातील लोक तुमच्या या विजयाचा गौरव भारतात करण्यास उत्सुक आहेत. यासाठी तुम्ही भारतात यावं असं म्हणत मोदींनी कमला हॅरिस यांना भारतभेटीचं निमंत्रण दिलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आयजनहॉवर एक्झिक्युटीव्ह ऑफिस बिल्डिंगमध्ये चर्चा केली.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.