kim Kardashian - Met Gala 2022 look Instagram
किमनं (Kim Kardashina) मेट गाला(Met Gala 2022) मध्ये हॉलीवूडची देखणी अभिनेत्री मर्लिन मुनरोच्या आयकॉनिक लूकला रीक्रीएट केलं होतं. तिनं मर्लिनच्या 60 वर्ष जुन्या गाऊनमध्ये स्वतःला फीट बसवण्यासाठी खूप मेहनत घेतलीय. स्क्वीज्ड साइज अशा या टाइट गाऊन मध्ये किम परफेक्ट फीट दिसली. किमनं गाऊनसोबतच पांढऱ्या रंगाचा फर कोटही कॅरी केला होता. ब्लॉन्ड हेअरकलर केलेल्या केसांची तिनं बन शेप हेअरस्टाईल केली होती. यासोबतच किमनं १८ कॅरेट व्हाइट गोल्ड डायनमंडचे कानातले घातले होते.
किमचा हा गाऊन पाहून मर्लिन मुनरोची आठवण सगळ्यांनाच आली. १९ मे,१९६२ मध्ये मॅडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये राष्ट्रपती जॉन कनेडींच्या वाढदिवसात मर्लिननं हा गाऊन घातला होता. यानंतर केवळ तीन महिन्यात मर्लिनचा मृत्यू झाला होता.
परफेक्ट डाएट केल्यानंतर मर्लिनचा गाऊन तर फीट होणारच होता,तो झाला. ज्यावेळी तो गाऊन फिट बसला तेव्हा आपण आनंदाने रडलो असं देखील किम म्हणाली. किम यंदाच्या मेट गाला २०२२ इव्हेंटसाठी आपला बॉयफ्रेंड पीट डेव्हिडसनसोबत आली होती. तिच्या एन्ट्रीवर त्यावेळी सर्वांच्या नजरा खिळून राहिलेल्या दिसल्या. किमनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. आणि मर्लिन मुनरोच्या स्मृतीप्रित्यर्थ पोस्ट लिहिताना,''गाऊनला जेन ल्युईस या फॅशन डिझायनरनं ६००० क्रिस्टल्सपासून तयार केल्याचं सांगितलं आहे''. या ड्रेसची किंमत तब्बल ३६.८४ करोड रुपये इतकी असल्याचं बोललं जात आहे.
किमनं तीन आठवड्यात तब्बल ७ किलो वजन कमी केलं आहे. किमनं आपल्या वेटलॉस जर्नीविषयीही बातचित केली आहे. आणि फक्त मर्लिन मुनरोचा हा टाइट गाऊन घालण्यासाठीच आपण वेटलॉस केल्याचं ती म्हणाली. गेल्या वर्षीच्या गाला इव्हेंटलाच यावर्षीचा लूक ठरवला होता असं देखील तिनं नमूद केलं.
वजन कमी करण्यासाठी दिवसांतून दोन वेळा सॉना सूट घालून ती ट्रेडमिल वर पळायची. चीनचं खाणं आणि कार्ब्सना 'बाय बाय' म्हटल्याचं देखील ती बोलली. फक्त भाज्या आणि प्रोटीन खाल्लं . स्वतःला उपाशी ठेवलं नाही पण काय खायचं याचे नियम स्वतःवर लादले असं ती म्हणाली. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.