Minister Eknath Shinde esakal
कास (सातारा) : महाबळेश्वर तालुक्यातील (Mahabaleshwar Taluka) दरे गावचे सुपुत्र आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी गावी आल्यानंतर आपल्या दुर्गम अशा कांदाटी खोऱ्यातील काही गावांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. कोयना जलाशयाच्या (Koyna Reservoir) पलिकडे दुर्गम भागात असणाऱ्या दरे गावावर मंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष प्रेम आहे. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून ते वेळ काढून महिना, दोन महिन्यातून आवर्जून गावी येत असतात. जुलैमध्ये शिंदे यांचे भात खाचरांमध्ये काम करतानाचे फोटो व्हायरल (Photo Viral) झाले होते. आताही दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या शेतात काम करत असतानाच दुपारी अचानक स्पीडबोटने (Speedboat) दुर्गम कांदाटी खोरे गाठत तेथील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यावेळी त्यांच्या सोबत कोरेगावचे आमदार महेश शिंदे उपस्थित होते.सदर कार्यक्रमात मंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदाटी भागातील अडचणी समजून घेतल्या व विकासात्मक कामाबद्दल भागातील लोकांना दिलासा दिला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून काही सूचना दिल्या तर मोरणी, आरव, शिंदी, वलवन चकदेव, म्हाळुंगे आदी गावांसाठी आरोग्य उपकेंद्र तात्काळ सुरू करण्यासंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना देवून तात्काळ हालचाली करण्यास सांगितले. या वेळी गावी आल्यानंतर आपल्या गावाकडील हळदीच्या व बटाट्याच्या शेतात काम करतानाचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून मंत्री शिंदे यांच्या साधेपणाची व गावावरच्या प्रेमाची प्रचिती येत आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.