Mithali Raj Retirement Records Cricket
Mithali Raj Retirement Records Cricket: भारतीय महिला क्रिकेटची महान खेळाडू मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 23 वर्षांच्या कारकिर्दीत मितालीने अनेक यश संपादन केले. मिताली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटर आहे. त्याचबरोबर महिला वनडे विश्वचषकात सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपदाचा विक्रमही तिच्या नावावर आहे. मितालीला 2003 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2017 मध्ये विस्डेन लीडिंग वुमन क्रिकेटर इन द वर्ल्ड अवॉर्ड देण्यात आला होता. मितालीला 2015 मध्ये पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. मितालीला 2021 मध्ये खेलरत्न पुरस्कार देण्यात आला.
मितालीला 'भारतीय क्रिकेटची तेंडुलकर' म्हटले जाते. मिताली ही भारतासाठी वनडे आणि टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे.
2017 च्या महिला क्रिकेट विश्वचषकादरम्यान, मितालीला सलग सात अर्धशतके झळकवले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे.
विश्वचषकात 1000 हून अधिक धावा करणारी मिताली ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.
मिताली वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. त्याने 232 सामन्यात 7805 धावा केल्या आहेत.
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारी मिताली ही पहिली महिला भारतीय क्रिकेटपटू आहे.
20 वर्षांहून अधिक काळ खेळणारी मिताली ही पहिली महिला क्रिकेटपटू देखील आहे.
एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक २४ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारी मिताली ही महिला खेळाडू आहे. तिने यंदाच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कला (२३ सामने) मागे टाकले आहे.
भारताकडून कसोटीत द्विशतक झळकावणारी मिताली ही एकमेव महिला फलंदाज आहे. मितालीने 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध 214 धावा केल्या होत्या. महिला क्रिकेटमधील कसोटीमधली ही दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.