Rajyasabha Electio voting Sakal
आज मुंबईत राज्यसभेच्या सहा जागेसाठी मतदान पार पडत असून भाजपाने आपले तीन उमेदवार उभे केले आहेत. त्याचबरोबर आजारी असलेले लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक अॅम्ब्युलन्सने मतदानासाठी हजर झाले आहेत.
आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी आल्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.आमदार लक्ष्मण जगताप हे पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या अॅम्ब्युलन्सने हजर झाले आहेत. त्यांना आधार देण्यासाठी आणि उचारासाठी डॉक्टरांची टीम त्यांच्यासोबत होेती.तसेच पुण्याच्या माजी महापौर आणि सध्याच्या आमदार मुक्ता टिळक यासुद्धा आाजारी असताना राज्यसभेच्या मतदानासाठी हजर झाल्या आहेत.आमदार लक्ष्मण जगताप यांना पीपीई कीट घालून मतदान करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टरांचा ताफा होता. त्यांचे स्वागत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. खाली उतरताच त्यांनी जगतापांचे टाळ्या वाजून अभिनंदन केले.मुक्ता टिळक या सुद्धा बेडरेस्टवर असताना पक्षाच्या उमेदवाराला राज्यसभेवर पाठवण्यासाठी मतदानास हजर राहिल्या आहेत. त्यांना येण्यासाठी पक्षाने अॅम्ब्युलन्सची सोय केली होती.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.