दुबई म्हणजे मजा, शॉपींग आणि धमाल असा एक सर्वसाधारण समज आहे. मात्र या समजाला धक्का देणारी एक वास्तू दुबईत आकाराला आली आहे, ती म्हणजे मोहम्मद बीन रशीद लायब्ररी.
तब्बल एक अब्ज अरब दिरहम एवढा खर्च करुन बांधलेली, सात माळ्याची ही इमारत दुबईच्या सांस्कृतिक शिरपेचात एक मानाचा तुरा रोवणार आहे.नऊ विशेष वाचनालये, अरेबीक, इंग्रजीसह विविध भाषांमधील १० लाखांहून अधिक छापील आणि डिजिटल पुस्तके, ६० लाख रिसर्च पेपरच्या खजीन्याने सुसज्ज असे सार्वजनिक वाचनालय दुबईत गुरुवारी सर्वसामान्यांसाठी खुले होत आहे.इथे विविध भाषांतील ७३,००० संगीत, ७५ हजार व्हिडीओचा संग्रह वाचकांसाठी ठेवला गेला आहे. याशिवाय विविध भाषांतील १३ हजार लेख , ३२५ वर्षांचा इतिहास उलगडणारी ५ हजार ऐतिहासिक छापील आणि डिजिटल जर्नल्स, ५०० दुर्मिळ पुस्तकांचा ठेवा येथे आहे.जगभरातील ३५ हजार छापील आणि डिजिटल वृत्तपत्रे वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. मोहम्मद बीन रशीद लायब्ररी ही संयुक्त अरब अमीरातीमधील नव्हे तर जगातील मोठ्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानानाने सज्ज असलेल्या सार्वनजनिक वाचनालयाच्या पंगतीत जाऊन बसणार आहे. वाचनालयाचे बांधकाम गेल्या ४ वर्षांपासून सुरु होते. दुबईच्या अल जद्दाफ भागात बांधण्यात आलेले हे वाचनालय समाजाच्या विकासात वाचन आणि संस्कृतीची भूमिका समजून घेणारी नवी अरब पिढी घडवेल असा आत्मविश्वास दुबईच्या प्रशासकांनी व्यक्त केला आहे.सात माळ्याचे सुसज्ज वाचनालय, तरुण, लहान मुले, मिडिया, बिझनेस लायब्ररीसह एकुण ९ विशेष ग्रंथालये येथे आहेत. ५४ हजार चौरस मिटर क्षेत्रफळ.अत्याधुनिक आणि नव्या तंत्रज्ञानाचा समावेश
- कृत्रीम बुध्दीमता.- आटोमेटेड स्टोरेज
- डिजिटायजेशन प्रयोगशाळा
- प्रश्नांना उत्तर देण्यासाठी स्मार्ट रोबोसकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.